मुंबई : ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणाऱ्या संघात टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माची निवड झाली आहे. दुखापतीमुळे त्याला या दौर्‍यावर जाणार्‍या संघात स्थान देण्यात आले नव्हते. सोमवारी, बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे की रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणाऱ्या संघात टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. त्याला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, परंतु तो कसोटी मालिकेत संघात असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतणार असल्याची माहितीही निवड समितीने दिली आहे.


दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये जाणाऱ्या भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा स्पिनर वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे. त्याला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळालं पण दुखापतीमुळे तो दौर्‍यावर जाणार नाही. बॅकअप विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.


टी-20 टीम


विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी , नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन


वनडे टीम


विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)


टेस्ट टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज