मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडच्या बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समननी लोटांगण घातल्यामुळे इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. टेस्ट सीरिजसाठी निवड न झालेला रोहित शर्मा मात्र सुट्टी एन्जॉय करतोय. रोहित शर्मानं इन्स्टाग्रामवर फॅन्टसी प्रिमिअर लीगची टीम शेअर केली. फूटबॉल प्रिमिअर लीगला सुरुवात झाली आहे. आपल्या फूटबॉल प्रेमाविषयी रोहित शर्मा नेहमीच व्यक्त होत असतो आता त्यानं त्याच्या आवडत्या खेळाडूंची टीम इन्स्टाग्रामवर शेअर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या टीममध्ये एव्हर्टन, वॉटफर्ड आणि लिव्हरपूलचे प्रत्येकी २ खेळाडू तर मॅन्चेस्टर युनायटेड, टॉटेनहम हॉट्सपर आणि मॅन्चेस्टर सिटीचा प्रत्येकी १ खेळाडू आहे. सबस्टिट्यूटमध्ये रोहितनं विली कॅबलेरो, जो बेनेट, जेम्स मॅकअर्थर आणि अलवारो मोराटाला संधी दिली आहे.


अशी आहे रोहितची टीम


अस्मीर बेगोविक, केड्रिक सोरेस, लुक शॉ, फिल जॅगिलका, किको फेमिनिया, मोहम्मद सलाह, केव्हिन डे ब्र्यून, डेल अली, रिचर्लसन डे आंद्रेड, रोबर्टो फिरमिनो, आंद्रे ग्रे