India vs Bangladesh Warm Up Match: टीम इंडियासाठी वर्ल्डकपची सुरुवात 5 जूनपासून होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडशी होणार आहे. मात्र त्यापूर्वी झालेल्या वॉर्म अप सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशावर 60 रन्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा आगामी वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये होणाऱ्या बदलांचे संकेत दिले होते. जाणून घेऊया वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये कसे आणि कोणते बदल होतील ते पाहूयात.


संजू सॅमनस करणार ओपनिंग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा रोहित शर्माने ओपनिंगसाठी यशस्वी जयस्वालची निवड केली नाही. वॉर्म अप सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला ओपनिंगला आला. पण या सामन्यात संजू काही खास कामगिरी करू शकला नाही. यावेळी त्याने 6 बॉल्समध्ये केवळ 1  रन केला. तर यशस्वी जयस्वालला फलंदाजीची संधी मिळाली नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मासोबत फक्त यशस्वी ओपनिंग करत होता. पण आता टीममध्ये ओपनिंगसाठी रोहितसोबत अनेक दावेदार मानले जातात. 


दुसरीकडे आयपीमध्ये विराट कोहलीने ओपनिंगला येऊन चांगली कामगिरी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये तो सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू होता. विराट कोहलीची खेळी पाहता अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये, असा दावाही करण्यात आला होता की, टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहलीही रोहितसोबत ओपनिंग करू शकतो. आता रोहितने संजू सॅमसनला ओपनिंगला पाठवून बदलाची चिन्हे दर्शवली आहेत. अशा परिस्थितीत आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या जागी संजू सॅमसन किंवा विराट कोहली यापैकी एक खेळाडू ओपनिंगला येण्याची शक्यता आहे.


बांगलादेशा विरूद्धचा सामना टीम इंडियाने जिंकला


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 182 रन्स केले होते. यावेळी बांगलादेशाच्या टीमला प्रत्युत्तरात 122 रन्स करता आले. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने अर्धशतक झळकावलं. यावेळी त्याने 53 रन्सची उत्तम खेळी केली. याशिवाय हार्दिक पांड्याने 23 चेंडूत 40 रन्स केले. ज्यामध्ये 2 फोर आणि चार सिक्स लगावले. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी भारतीय टीमकडून चांगली कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. अर्शदीपने तीन ओव्हर्समध्ये केवळ 12 रन्स दिले.