मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात थोडा जखमी झाला होता. मात्र, दुखापत किती गंभीर आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. इंग्लंडच्या डावातील 28व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित कव्हर्समध्ये फिल्डींग करत होता. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने शॉट खेळला आणि बॉल रोखण्याच्या प्रयत्नात रोहितचा खांदा निखळला. मात्र त्यानंतरचं दृश्य आश्चर्यकारक, अविश्वसनीय आणि अकल्पनीय होतं.


कारण रोहितने स्वतःच त्याचा निखळलेला खांदा रिलोकेट केला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि विवेक राजदान कॉमेंट्री करत होते. यावेळी दोघंही गमतीने म्हणाले की, रोहित शर्माला पाहून फिजिओ घाबरला असावा. कारण त्यासा आपली नोकरी धोक्यात आली, असं वाटलं असेल.



रोहित त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत दुखापतींमुळे त्रस्त आहे. नुकताच तो कोरोना संसर्गामुळे इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना खेळू शकला नाही. त्याच्या फिटनेसबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त केली जात आहे. 


मात्र, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तो फलंदाजीसाठी उतरला. यावेळी त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं होतं. इंग्लंड संघाने दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा इंग्लंडने 100 रन्सनी दारूण पराभव केला आहे.