Virat Kohli Birthday : कॅमेराच्या समोर अनेकदा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यामध्ये पक्की मैत्री पाहायला मिळते. मात्र अनेकांच्या म्हणण्ययानुसार, या ऑफ द कॅमेरा या दोघांमधून विस्तवही जात नाही. अनेकदा कॅमेराच्या मागे या दोघांमध्ये काहीतरी वेगळीच कहाणी सुरु असल्याचं दिसून येतं. इतकंच नव्हे तर दोघांमध्ये वाद असल्याच्या बऱ्याच बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र याबाबत कधीही ना रोहित शर्मा खुलेपणाने बोललाय ना विराट कोहली.


विराटच्या वाढदिवशी रोहितकडून पोस्ट नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज विराट कोहलीचा 34 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी विराटविषयी सोशल मीडियाव पोस्ट केली आहे. इतकंच नाही तर अनेक परदेशी खेळाडूंनी देखील विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विराटबद्दल पोस्ट न केल्याने चाहत्यांच्या भुवया पुन्हा उंचावल्यात आहेत. 


मीडियासमोर एकमेकांची बाजू घेणं


अशी परिस्थिती अनेकदा समोर आली आहे, ज्यावेळी रोहितला विराटच्या खराब परफॉर्मन्सविषयी प्रश्न विचारण्यात आले. मात्र यावेळी रोहितने विराटच्या बाजूने बचावपूर्वक उत्तर देत त्याला पाठिंबा दिलाय. 


रोहित आणि विराटची 'कॅमेरा' वाली दोस्ती?


  • टीम इंडियाचा खेळाडूंनी विराट कोहलीचा वाढदिवस ऑस्ट्रेलियात साजरा केला.

  • अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर कोहलीसाठी पोस्ट आणि स्टोरीजही पोस्ट केल्या आहेत.

  • पण रोहित शर्माने सोशल मीडियावर विराटसाठी काहीही पोस्ट केलेलं नाही.

  • कर्णधार रोहित शर्मा विराट कोहलीला इन्स्टाग्रामवरही फॉलो करत नाही.


विराटचा जल्लोषात वाढदिवस साजरा 


भारतीय संघाचा माजी कर्णधार, King Kohli ने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड (t20 world cup 2022 ) कप स्पर्धेत विराटची बॅट ही प्रतिस्पर्धींना चांगलीच झोडून काढत आहे. पाकिस्तानविरुद्धची विराटची खेळी ही त्याच्या कारकीर्दितील सर्वोत्तम ठरली. आता चाहत्यांना भारताने ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा 15 वर्षांचा दुष्काळ संपवावा, अशी आस लागलीये. 


आज भारतीय संघ मेलबर्नमध्ये विराटचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी सज्ज असताना शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.