DC vs MI WPL 2023: क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीगची (WPL 2023) फायनल खेळवली जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये ही फायनल सामना रंगणार आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली टीमने आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या पुरुष टीमने महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजचा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम कोणतीही कसर सोडणार नाहीयेत. यावेळी मुंबई इंडियन्सच्या पुरुषांच्या टीमने महिलांना खास संदेश दिला आहे. 


मुंबई इंडियन्सच्या पुरुष टीमचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी म्हणाला, मी आमच्या महिला टीमला फायनल सामन्यासाठी भरपूर शुभेच्छा देतो. गेल्या 3-4 आठवड्यांपासून टीमने ज्या प्रकारे खेळ केला आहे, मी त्याचा भरपूर आनंद घेतला आहे. आजची ही फायनल आणि तुम्हाला प्रत्येक दिवशी फायनल खेळण्याची संधी मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही याचा भरपूर आनंद घ्या. आम्हीही तुमच्यासाठी खूप खुश आहोत, तुम्ही जा आणि तुमचं सर्वोत्तम द्या.


याचा व्हिडीयो मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. रोहित शर्मासोबत मुंबईच्या पुरुष टीममधील खेळाडू सूर्यकुमार यादव, टिम डेविड, तिलक वर्मा आणि जेसन बेहरनडोर्फ यांनी महिलांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्यात.


महिलांच्या टीमला शुभेच्छा देताना सुर्यकुमार यादव म्हणाला, मुंबईच्या मुलींनी फायनल गाठली आहे आणि त्या पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. मी या सर्वांना फायनल सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा शेवटचा सामना जिंकत विजय मिळवा.


दुसरीकडे बेहरनडोर्फने यांनी सांगितलं की, आतापर्यंत आपल्या टीमसाठी ही किती छान टूर्नामेंट झाली. छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या केल्या तर सर्व काही ठीक होणार आहे. शुभेच्छा, आम्ही हा सामना नक्की पाहणार आहोत.


मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा अंतिम सामना (WPL Final) खेळला जाईल. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोण मारणार बाजी?  मुंबई (MI) की दिल्ली (DC)? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. 


कोणत्या टीमचं पारड जड?


दोन्ही टीमने आतापर्यंत लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती. दोन्हीही टीम्सने लीगमध्ये 6 सामने जिंकले असून 2 सामन्यांत पराभव झाला आहे. दिल्लीच्या टीमने 12 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील दिल्लीचं पारडं जड असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे मागील सामन्यात दिल्लीने मुंबईचा पराभव केला होता.