Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांमध्ये काही कमी नाहीये. भारतात रोहितचे अनेक चाहते (Rohit Sharma fans) असून त्याचं रोहितवर प्रचंड प्रेम आहे. रोहितचे हे चाहते त्याच्याविषयी प्रत्येक गोष्टीची अपडेट घेऊ इच्छितात. यामध्ये रोहितची डबल सेंच्युरी, रोहितची हॅटट्रिक किंवा रोहितच्या इतर गोष्टींची माहिती चाहत्यांना हवी असते. मात्र आनंदाच्या गोष्टींसोबतच रोहितच्या आयुष्यात एकदा फार कठीण काळ देखील होता. याबाबत फार क्वचितच लोकांना माहिती असू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 30 एप्रिल असून रोहित शर्माचा आज वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. रोहितने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. असं रोहित शर्माच्या या कठीण काळाबाबत तुम्हाला कळलं, तर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. याच कारण म्हणजे कधी एकेकाळी रोहित शर्माने देखील डिप्रेशनचा (Rohit Sharma Was Depressed) सामना केला होता. 


रोहित शर्माने खुद्द त्याच्या या परिस्थितीबाबत खुलासा केला आहे. याविषयी बोलताना रोहित म्हणाला होता की, "तो फार कठीण काळ होता. त्या काळात मी फक्त माझ्या रूममध्ये एकटा बसून विचार करायचो. यामध्ये मी, माझ्याकडून नेमकी चूक काय झाली, हा विचार करत बसायचो. त्यावेळी मी जवळपास 1 महिना डिप्रेशनमध्ये होतो आणि मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती."


2011 चा वर्ल्डकप भारताने जिंकला होाता. दरम्यान या वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये रोहितला स्थान देण्यात आलं नव्हतं. वर्ल्डकपविजेत्या भारताच्या टीममध्ये रोहितला स्थान मिळवता आलं नव्हतं. रोहित शर्माची ही गोष्ट तेव्हाचीच आहे. 


रोहित शर्मा पुढे म्हणाला की, मला अजूनही आठवतंय की, त्यावेळी साऊथ आफ्रिकेमध्ये मी होतो. तेव्हाच मला ही गोष्टी समजली होती. त्यावेळी बोलण्यासाठी माझ्याकडे कोणीही नव्हतं. मी एकटा माझ्या रूममध्ये जाऊन विचार करत बसलो की, माझ्याकडून नेमकं काय चुकलं.



1 महिना मी डिप्रेशनमध्ये होतो आणि मी त्यावेळी कोणाशीही बोलत नव्हतो. मात्र आता मला असं वाटतं की, तो माझ्या आयुष्यातील फार मोठा काळ होता. मी त्यावेळी अवघ्या 23 किंवा 24 वर्षांचा होतो. मात्र मी मनाशी पक्कं केलं होतं की, अजूनही माझ्याकडे खूप क्रिकेट बाकी आहे. हा माझा शेवट नाहीये. मी माझ्या खेळाच्या जोरावर कमबॅक करू शकतो. आणि त्यानंतर तसंच घडलं, असंही रोहित शर्माने कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं.