Rohit Sharma : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर सिरीज (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमध्ये टीम इंडियाने (Team India) पहिले 2 सामने जिंकून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर तिसऱ्या सामन्याला इंदूरमध्ये बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा (Rohit Sharma) निर्णय काही फारसा फायदेशीर ठरला नाही. मात्र या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं नशीब मात्र खूपच चांगलं होतं. असं असूनही रोहितला संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. 


स्मिथमुळे Rohit Sharma ला मिळालं जीवनदान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने टॉस जिंकून (Team India win Toss) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहितसेनेची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. 27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.


टीम इंडियाच्या पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरचा चौथा बॉल रोहित शर्माच्या मिडल स्टंपवर पडला. रोहितने हा बॉल डिफेंड केला, मात्र हा बॉल जास्त बाऊंस झाल्यामुळे बॉल बॅटवर न लागता थेट पॅटवर लागला. यावेळी मिचेलने एलबीडब्ल्यूसाठी अपील ही केलं, पण मैदानातील अंपायरने याला नॉटआऊट करार दिला. 


DRS वाचवणं पडलं महागात


स्टार्चने अपील केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गोलंदाज आणि विकेटकीपरशी याबाबत बातचीत केली. यावेळी खात्री नसल्याने स्मिथने डीआरएस वाचवण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर जेव्हा रिव्ह्यू दाखवण्यात आला तेव्हा रोहित (Rohit Sharma) एलबीडब्ल्यू आऊट असल्याचं दिसून आलं. अशातच स्मिथच्या एका चुकीच्या निर्णयाने रोहितला जीवनदान मिळालं.



आर अश्विनने पटकावला बहुमान


आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने गोलंदाजांची कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. यात भारतीय गोलंदाजाने अव्वल स्थान पटकावंत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) मागे टाकलं आहे. टीम इंडियाचा दिग्गज स्पीन गोलंदाज आर अश्विन जगातील नंबर वन गोलंदाज नबला आहे. 36 वर्षांच्या आर अश्विनच्या (R Ashwin) खात्यात 864 पॉईंट जमा झाले आहेत. तर जेम्स अँडरसनच्या खात्यात 859 पॉईंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 858 पॉईंट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.