मुंबई : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झालीये. गुरुवारी (6 ऑक्टोबर) कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मुंबईहून पर्थला रवाना झालीये. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी कुटुंबासोबत दिसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने आपल्या कुटुंबासह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. रोहितने पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबतचे फोटोही शेअर केले आहेत. आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन मंदिरात बसलेला रोहित शर्माचा फोटो व्हायरल होत आहे.


आशिया कपपासून टीम इंडिया सतत क्रिकेट खेळतेय. आशिया कपनंतर भारताने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळली. रोहित शर्माने दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केलं. आता तो ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे, जिथे 13 नोव्हेंबरला वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे.



टीम इंडियाने चांगली कामगिरी करावी आणि शेवटपर्यंत स्पर्धेत टिकून राहावे अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. आणि 13 ऑक्टोबरला कर्णधार रोहित शर्माच्या हातात ट्रॉफी असावी. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच आयसीसी ट्रॉफीमध्ये सहभागी होतेय.


टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.


स्टँडबाय खेळाडू


मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.