Rohit Sharma : टीम इंडिया ( Team India ) आणि मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) सलग 2 सामन्यांमध्ये रोहित शर्मा शून्यावर आऊट झाला होता. यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर अनेक टीका करण्यात आल्या. अनेकदा रोहित शर्माला त्याच्या वजनावरून ( Rohit sharma weight ) देखील ट्रोल करण्यात येतं. अशातच रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) आता एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये रोहित शर्माने पोट आत घेतल्याचं दिसून येतंय. 


एअर हॉस्टेससोबत काढला हिटमॅनने फोटो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल अनेक गोष्टी व्हायरल होतायत. अशातच मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार रोहित शर्माने एक एअर हॉस्टेससोबत फोटो काढला आहे. या फोटोमध्ये स्लिम आणि फीट दिसण्यासाठी पोट आत घेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. रोहितचा ( Rohit sharma weight ) हाच फोटो व्हायरल झाला असून नेटकरी आता त्याला चांगलंच ट्रोल करतायत.


युझर्सकडून रोहित शर्मा ( Rohit sharma weight ) पुन्हा ट्रोल



खराब खेळीनंतर अनेकदा रोहितला त्याच्या वजनावरून ट्रोल करण्यात येतं. दरम्यान रोहितला ज्या फोटोमुळे ट्रोल केलं जातंय, त्याने तो नसता काढला तर बरं झालं असतं. सोशल मीडियावर ( social Media ) चाहते रोहितची फारच मजा घेतायत. 


आयपीएलमध्ये रोहितची बॅट चालेना!


गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा खराब फॉर्मशी झुंज देताना दिसतोय. शनिवारच्या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला होता. इतकंच नाही तर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आयपीएलमध्ये आतापर्यंत तब्बल 16 वेळा शून्यावर बाद झालाय. हा नवा रेकॉर्ड हिटमॅनने त्याच्या नावे केलाय.


आयपीएलमच्या 2023 च्या सिझनमध्ये रोहित शर्माची ( Rohit Sharma ) बॅट काही फारशी चाललेली नाही. रोहित शर्माला केवळ दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात चांगला स्कोर करणं शक्य झालं होतं. दिल्लीविरूद्ध रोहितने ( Rohit Sharma ) 5 बॉल्समध्ये 65 रन्सची खेळी केली होती. त्यामुळे दुसरीकडे खराब फॉर्मवरून देखील रोहितला टीकांचा सामना करावा लागतोय.