सिडनी : आज टीम इंडियाने वर्ल्डकपच्या स्पर्धेतील दुसरा सामना खेळला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 56 रन्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने उत्तम फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची एक लाजीरवाणी गोष्ट कॅमेरात कैद झाली. इतकंच नाही तर याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना टीम इंडियाच्या 10 व्या ओव्हरची आहे. यावेळी इनिंग ब्रेक झाला होता. ब्रेकच्या दरम्यान विराट कोहली रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानावर आला. टीमचे कोच राहुल द्रविड देखील रोहितशी बोलत होते. कपडे नीट करण्यासाठी यावेळी रोहितने भर मैदानात त्याची पँट काढली आणि हेच दृश्य कॅमेरात कैद झालं. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 



टीम इंडियाचा विजय


टी20 वर्ल्ड कपमधील दुसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला आहे.नेदरलँडचा (Netherland) 56 धावांनी पराभव करत टीम इंडियाने (Team India) हा दुसऱा सामना जिंकला आहे. हा सामना जिंकत 4 गुणांसह टीम इंडिया पॉईंटस् टेबलमध्ये टॉपवर पोहोचली आहे.


टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या नेदरलँडची (Netherland) सुरुवात चांगली झाली नव्हती. टीम इंडियाच्या (Team India) भेदक गोलंदाजी समोर नेदरलँडचे बॅटसमन जास्त काळ क्रिझवर टिकू शकले नाही. आणि एका मागून एक विकेट पडायला सुरुवात झाली. नेदरलँडच्या एकाही बॅटसमनला 20 ही धावसंख्या देखील गाठता आली नाही. 


टीम इंडियाकडून  (Team India)अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने 2-2 विकेट घेतले, तर भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांनीही 2-2 विकेट घेतल्या. अखेरीस  नेदरलँड्सला 9 गडी गमावून 123 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाने 56 धावांनी नेदरलँड्सचा पराभव केला. टीम इंडियाचा फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांनी विजयात मोलाची भूमिका बजावली. 


दरम्यान टीम इंडियाने (Team India) प्रथम बॅटींग करत 2 विकेट गमावून 179 धावा केल्या होत्या. विराटच्या 62, रोहितच्या 53 आणि सुर्यकुमार यादवच्या 51 धावांच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या उभारली होती.