मुंबई : श्रीलंका इंडियाच्या दौऱ्यावर आली आहे. यावेळी टीम इंडियाने श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. यानंतर पहिल्या झालेल्या टेस्ट सामन्यातही भारताने श्रीलंकेचा पराभव केला. यानंतर 12 मार्चपासून दुसऱ्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान पहिला टेस्ट सामना भारताने एक डाव आणि 222 रन्सने जिंकला. यामध्ये रविंद्र जडेजाने 175 रन्सची नाबाद खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान यावेळी रवींद्र जडेजा 175 रन्सवर नाबाद असताना देखील रोहित शर्माने डाव घोषित केला. जडेजाला 200 रन्स करण्याची संधी होती मात्र ती हुकली. त्यामुळे रोहित शर्मावर सोशल मीडियावरून टीकाही करण्यात आली. यावर आता भारताचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.



रोहित शर्माविषयी बोलताना अश्विन म्हणाला, "पहिल्या टेस्ट सामन्यात मी रोहितला चांगल्या पद्धतीने ओळखलं. तो प्रत्येकाचा विचार करणारा कर्णधार आहे. त्याची इच्छा होती की जडेजाची डबल सेंच्युरी व्हावी. त्याचसोबत तिसरा स्पिनर म्हणून खेळणाऱ्या जयवंत यादवलाही संधी मिळावी असं त्याच्या मनात होतं."


BCCIला दिलेल्या मुलाखतीत अश्विन म्हणाला, "रोहितला आपण सर्व ओळखतो. तो खूप चांगला आणि स्ट्रॉंग आहे. एक लीडर म्हणून त्याच्यात अनेक गुण चांगले आहेत."


दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजानेही यावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, "रोहित शर्माने कुलदीपद्वारे मला 200 रन्स करण्याचा मेसेज पाठवला होता. ज्यानंतर डाव घोषित केला जाणार होता. मात्र मी यासाठी नकार दिला. जर आम्ही थकलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना चहाच्या पहिलं खेळायला दिलं तर आम्हाला विकेट्स मिळतील हा विचार मी केला."