Rohit sharma: रोहित शर्माच्या `या` सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?
Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
Rohit sharma: येत्या जूनपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 5 जून रोजी टीम इंडियाची पहिली लढत आयर्लंडसोबत होणार आहे. दरम्यान टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया. परंतु सर्व खेळाडूंना अडचणीत आणणारी आपली सवय तो सोडणार का?
काय आहे रोहित शर्माची वाईट सवय?
रोहित शर्माच्या या वाईट सवयीबद्दल एक इंटरव्ह्यूमध्ये विराट कोहलीने देखील खुलासा केला होता. विराट कोहलीच्या सांगण्यानुसार, रोहित शर्माला एक विसरण्याची सवय आहे. या सवयीमुळे रोहित कुठेही काहीही विसरून जातो. एका वेळी रोहितने हॉटेलच्या रूममधून परतत असताना पर्स, फोन, आयपॅड इतकंच नाही तर पार्सपोर्ट देखीव विसरला होता.
विराट या इंटरव्ह्यूमध्ये पुढे म्हणाला होता की, मी कधीही कोणाला इतक्या गोष्टी विसरताना पाहिलं नाही. त्याला टीमच्या बसमध्ये चढलं की लक्षात येतं की, तो काही गोष्टी हॉटेलच्या रूममध्ये विसरला आहे. रोहित शर्माच्या या सवयीमुळे आता जाण्याआधी हॉटेल मॅनेजरला मेसेज केला की, रोहितने सगळं ठेवलंय का ते विचारा. ते हो म्हणाले तरच टीम बस पुढे निघते.
वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा फॉर्म्युला तयार?
रोहित शर्मा वर्ल्ड कप 2024 मध्ये परत एकदा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. रोहित शर्माची कॅप्टन्सी नेहमीच चर्चेत असणार आहे. यामुळे आपल्या कॅप्टन्सीच्या अनुभवाच्या जोरावर रोहित शर्मा पूर्ण सामन्याची स्थिती बदलू शकतो, यामुळे रोहित शर्मा फलंदाज आणि रोहित शर्मा कर्णधार टीम इंडियासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे. दुसरा सर्व्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाच्या गोलंदाजीची कमान सांभाळणार आहे. बुमराह वर्ल्ड कप 2024 मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे.
टीम इंडियाची 'कुलचा' च्या जोडीवर (कुलदीप - चहल) भारतीय गोलंदाजीची एक मोठी जबाबदारी असणार आहे. यानंतर फलंदाजीत विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव हे दोघं फलंदाज मिडल ऑर्डरमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीची कमान सांभाळणार आहे. या जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे.