निराश दिसला Rohit Sharma; कर्णधाराने सांगितलं, कुठे झाली नेमकी चूक...!
लागोपाठ दोन सामन्यांतील पराभवानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसला.
दुबई : आशिया कप 2022 (Asia Cup 2022)च्या सुपर-4 फेरीत भारतीय क्रिकेट टीमला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं . दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा (IND vs SL) 6 विकेटने पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाचा स्पर्धेतील मार्ग कठीण झालाय. भारतीय टीमला (Team India)आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे. दरम्यान लागोपाठ दोन सामन्यांतील पराभवानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसला. (Rohit Sharma told where was the mistake after loss vs shrilanka)
श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला, "आम्ही या सामन्यात नशिबाने चुकीच्या मार्गावर होतो. आम्ही फलंदाजीत ज्या प्रकारची सुरुवात केली, त्याचा फायदा आम्हाला घेता आला नाही. मला वाटतं की, आम्ही 10-15 धावा कमी केल्या आणि आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागले."
'आम्ही श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी अनेक रणनीती बनवल्या होत्या आणि फिरकीचा अधिक चांगला वापर करण्याचा विचार केला होता. पण आम्ही त्या पूर्णपणे अंमलात आणू शकलो नाही. गोलंदाजांनी शेवटी दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तो पुरेसा ठरला नाही, असंही रोहित म्हणालाय.
रोहितने वेगवान गोलंदाज आवेश खानबद्दलही अपडेट दिले. तो म्हणाला, "आवेश आजारपणामुळे खेळू शकला नाही. आम्ही दौऱ्यावर चार वेगवान गोलंदाजांसोबत जातो. अशावेळी तीन वेगवान गोलंदाजांच्या जोडीने खेळण्याची सवय लावावी लागते. मला वर्ल्डकपपूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तीन वेगवान गोलंदाजांसोबत खेळताना आम्हाला काय केलं पाहिजे हे मला समजतंय."
रोहितच्या म्हणण्यानुसार, “गेल्या वर्ल्डकपनंतर आम्ही प्रथमच सलग दोन सामने हरलोय. मला या आशिया कपमध्ये कॉम्बिनेशन करायचं होतं. यामध्ये तुम्हाला अनेक उत्तरे मिळतात. मी पूर्ण श्रेय अर्शदीपला देऊ इच्छितो कारण अशी गोलंदाजी कौतुकास्पद होती. चहल आता बराच काळ खेळत असून तो अनुभवी झालाय."