Rohit Sharma: सध्या एशिया ( Asia Cup 2023 ) कप खेळला जात असून टीम इंडियाने ( Team India ) या स्पर्धेच्या जवळपास फायनलमध्ये धडक मारलीये. सुपर 4 च्या चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेच्या संघाचा 41 रन्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडिया ( Team India ) 11 व्यांदा एशिया कपची फायनल खेळणार आहे. दरम्यान या सामन्यामध्ये एक घटना अशी घडली ज्यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि के.एल राहुल यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सोडून कोणताही भारतीय फलंदाज जास्त वेळ टिकू शकला नाही. टीम इंडियाने श्रीलंकेला 214 रन्सचं आव्हान दिलं होतं. यानंतर ज्यावेळी श्रीलंकेची टीम फलंदाजीसाठी आली तेव्हा रोहित शर्माने ( Rohit Sharma ) घेतलेल्या एका DRS वरून के.एल राहुलसोबत नाराजी झालेली दिसून आली. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.


के.एल राहुलने मनाई करूनही रोहितने घेतला DRS


भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आतापर्यंत एशिया कपमध्ये DRS चा काही खास उपयोग करू शकलेला नाही. याचीच प्रचिती श्रीलंकेविरूद्ध पहायला मिळाली. झालं असं की, कुलदीप यादवच्या ओव्हरमध्ये चरिथ असलंका फलंदाजी करत होता. चरिथ असलंका बॉलला वाकून डिफेंड करण्यासाठी गेला. यावेळी बॉल ग्लोजला लावून कीपरच्या ग्लोजला लागला आणि थेट रोहितच्या हाती गेला. यावेळी रोहितला ( Rohit Sharma ) वाटलं की, बॉल फलंदाजाच्या बॅटला लागून कॅच आहे.


या घटनेनंतर टीम इंडियाने जोरदार अपील केलं. इतकंच नव्हे तर कुलदीपला देखील विकेटची खात्री होती. मात्र के.एल राहुलला पूर्णपणे खात्री नव्हती. त्याने रोहितला DRS घेऊ नको असं सांगितलं. मात्र कर्णधाराने कोणाचं न ऐकता स्वतःचं खरं करत रिव्ह्यू घेतला. ज्यानंतर रिप्लेमध्ये सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. ज्यानंतर रोहित ( Rohit Sharma ) आणि राहुल एकमेकांशी बोलताना दिसले. जर यावेळी रोहितने राहुलचं ऐकलं असतं कर रिव्हू वाचला असता.