मुंबई : आयपीएलचा 14 वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध केकेआर यांच्या रंगला होता. पुण्यामध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले आहेत. शिवाय त्यांनी यावेळी थेट निशाणा मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावर साधलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल झाला होता. रोहितने 12 बॉल्समध्ये अवघे 3 रन्स केले. सलग तिसरा सामना हरल्यानंतर रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. यावेळी रोहितला त्याच्या वडापाव खाण्याच्या सवयीवरून डिवचण्यात आलं. 






सोशल मीडियावर रोहितला ट्रोल करताना एका युझरने म्हटलंय की, जोपर्यंत रोहित शर्मा कर्णधार आहे, तोपर्यंत मुंबईत वडापाववर बंदी आणली पाहिजे. तर दुसऱ्या एका युझरने लिहिलंय की, कर्णधार रोहित शर्मा संपला आहे. याचा मला त्रास होतोय. रात्री उशिरापर्यंत खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्याचा खेळ खराब होतोय. तो कर्णधार असेपर्यंत वडा पावावर बंदी घातली पाहिजे.


रोहित शर्माला ट्रोल करत एकाने म्हटलंय की, 'वडा पाव रोहित शर्मा 3 (12) ने टेस्ट इनिंग खेळलीये. "सध्याचा ऋतुराज गायकवाड हा रोहित शर्माच्या कोणत्याही वर्जनपेक्षा चांगला खेळाडू आहे.' असा मीम शेअर करून रोहित शर्माला ट्रोल करतोय.


दरम्यान पॅट कमिन्सच्या वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकाताला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला.