मुंबई : देशभरात सोमवारी उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कलाकारांपासून खेळाडूंनी तिरंग्यासोबतचे फोटो सोशल मीडिय़ावर पोस्ट केले होते. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) देखील तिरंग्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.मात्र त्याचा हा फोटो वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसतोय.कारण सोशल मीडियावर त्याला या फोटोवरून ट्रोल केलं जातंय.नेमकं त्याचं या फोटोत काय चुकलंय ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा  (rohit sharma) सध्या ब्रेकवर असून तो थेट आशिया कपमध्ये परतणार आहे. आशिया चषक 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणार आहे, जिथे रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. मात्र यावेळी रोहित शर्मा  (rohit sharma) त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत असून सोशल मीडियावर तो ट्रोल होत आहे.


खरंतर, 15 ऑगस्टला रोहित शर्माने  (rohit sharma) चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हातात तिरंगा घेतलेला एक फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र हा फोटो मुळ फोटो नसल्याचं ट्रोलर्सचं म्हणण आहे. एकूणच काय तर ट्रोलर्सना हा फोटो फोटोशॉप केल्याचं वाटतं आहे. त्यामुळे रोहित शर्मा ट्रोल होतोय. 


ट्रोलर्स काय म्हणाले
 रोहित शर्माच्या  (rohit sharma) फोटोचा उल्लेख करताना ट्रोलर्सने लिहिले की, हॅप्पी फोटोशॉप कॅप्टन. तसेच काही चाहत्यांनी लिहिले की, मला वाटले फक्त तिरंगा इडिट केला आहे, परंतु यात रॉड देखील इडीट केला आहे. तर काही ट्रोलर्सने तर त्यांची संपत्तीच काढली. या व्यक्तीकडे लाखो रुपये आहेत, पण तो ध्वज खरेदी करू शकला नाही आणि त्याला फोटोशॉप करावे लागले, अशी कमेंट त्याने केली. 



दरम्यान रोहित शर्माच्या  (rohit sharma) या फोटोमुळे आता वाद निर्माण झालाय.ट्रोलर्स त्याला सोशल मीडियावर ट्रोल करतायत. केवळ कर्णधार रोहित शर्माच नाही तर विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, केएल राहुलसह टीम इंडियाच्या इतर स्टार खेळाडूंनीही सोशल मीडियावर एक फोटो जारी करून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.