Rohit Sharma On Playing Cricket In Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेटचा महासंग्रामच! केवळ भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना नाही तर सर्वच क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटलं की स्टेडियम खचाखच भरलेलं असतं. खरं तर सामन्याची तिकीटविक्री सुरु होते तेव्हाच काही हजारांपासून लाखांपर्यंतच्या किंमतीला ही तिकीटं विकली जातात. यावरुनच या सामन्यांची क्रेझ दिसून येते. भारत-पाक सामना लाइव्ह पाहणाऱ्यांची संख्या कोट्यवधींमध्ये असते. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका 2007-2008 साली खेळले होते. दोन्ही संघ मागील एका तपाहून अधिक काळापासून केवळ आयसीसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे ते केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.


क्रिकेट मालिकांबद्दल काय म्हणाला रोहित?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवण्यासंदर्भातील प्रश्नावर सामान्यपणे मागील बऱ्याच काळापासून कोणतेही क्रिकेटपटू थेट बोलत नाहीत. मात्र काही काळापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील मालिकेबद्दल अगदी स्पष्टपणे आपलं मत व्यकर्त केलं होतं. मालिका आणि सामने खेळवण्याचा निर्णय हा त्या त्या देशाच्या क्रिकेट मंडळांचा निर्णय असतो. मालिका निश्चित करणं हे कर्णधार म्हणून माझं किंवा इतर खेळाडूंचं काम नाही असंही रोहितने स्पष्ट केलेलं. आमच्यासाठी ज्या मालिका ठरवल्या जातात आम्ही तिथे फक्त त्या खेळण्यासाठी पोहोचतो, असंही रोहित म्हणाला.


...तर पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास तयार


पुढे बोलताना रोहितने, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आम्हाला पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली तर आम्हाला कराहीच अडचण नाही," असं म्हटलं होतं. पाकिस्तानी स्पोर्ट्स कंटेट क्रिएटर फरिद खानने रोहितच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


नक्की पाहा हे फोटो >> Kavya Maran Love Life: काव्याचा ब्रॉयफ्रेण्ड कोण? तिघांशी जोडलं जातंय नाव; पंत, संगीतकार अन् 'हा' फलंदाज


फरिद खानने, "रोहित कायमच पाकिस्तानबद्दल आणि पाकिस्तानी चाहत्यांबद्दल चांगल्या गोष्टी बोलतो. तो फार ग्रेट आहे," असं म्हटलं आहे. त्याने हा व्हिडीओ काल म्हणजेच 21 मे रोजी पोस्ट केला आहे.



2023 मध्येच बीसीसीआयने संघ पाठवण्यास दिलेला नकार


भारताने पाकिस्तान यजमान राहिलेल्या आशिया चषक 2023 च्या स्पर्धेसाठी पाकिस्तानात संघाला पाठवण्यास नकार दिला होता. बीसीसीआयने ठाम भूमिका घेत संघाला पाकिस्तानात पाठवणार नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आलेले. इतर संघांचे सामने पाकिस्तानमध्ये झाले होते. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने 10 विकेट्सने श्रीलंकेला पराभूत केलं होतं. आता 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार असून त्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


नक्की वाचा >> 'माझ्या घरावर दगडफेक करण्यासाठी फार..', रोहित शर्माचं विधान चर्चेत; म्हणाला, 'जेव्हा तुमच्या..'


आता 9 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान


भारत आणि पाकिस्तानचा संघ पुढील महिन्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नसाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघ टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत 7 वेळा आमने-सामने आले असून भारताने यापैकी 6 सामने जिंकलेत.