काव्या मारनचा ब्रॉयफ्रेण्ड कोण? तिघांशी जोडलं जातंय नाव; पंत, संगीतकार अन् 'हा' फलंदाज

Kavya Maran Love Life: काव्या मारन हे नाव क्रिकेट चाहत्यांना ठाऊक नाही असं सध्या तरी शक्य नाही कारण सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यामध्ये वारंवार टीव्हीवर झळकणारा चेहरा आता प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या ओळखीतील चेहऱ्यापैकी एक झाला आहे. आपल्या सैंदर्याबरोबरच मैदानावरील प्रतिसादासाठी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असलेल्या काव्या मारन यांच्या लव्ह लाइफबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे.

| May 22, 2024, 12:58 PM IST
1/14

Kavya Maran Love Life

आयपीएल 2024 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादच्या संघाला पराभूत केलं. केकेआरच्या संघाने चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली तर दुसरीकडे संघाच्या पराभवामुळे सनरायझर्सच्या मालकीण काव्या मारन यांचा चेहरा पडल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं.

2/14

Kavya Maran Love Life

काव्या मारन या केकेआर विरुद्ध सनरायझर्स सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होत्या. सामन्यातील प्रत्येक मोठ्या घडामोडीनंतर काव्या मारन यांची झलक टीव्हीवर पाहायला मिळत होती.

3/14

Kavya Maran Love Life

उद्योगपती कलानिधी मारन यांची कन्या असलेल्या काव्या अनेकदा मैदानात आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावताना दिसतात.

4/14

Kavya Maran Love Life

काव्या या त्यांच्या सौंदर्यामुळे आणि मैदानातील उपस्थितीमुळे आयपीएलच्या कालावधीत चांगल्याच चर्चेत असतात.

5/14

Kavya Maran Love Life

काव्या यांच्या लव्ह लाइफसंदर्भातही अनेक गोष्टी सोशल मीडियावर चर्चेत असतात. काव्या यांच्यासंदर्भातील अनेक अफवा व्हायरल होताना दिसतात. 

6/14

Kavya Maran Love Life

खरं तर काव्या यांच्या लव्ह लाइफबद्दल, जोडीदाराबद्दलची कोणतीही माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही. मात्र काव्या यांचा संबंध थेट दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतशीही जोडण्यात आला आहे.

7/14

Kavya Maran Love Life

इंटरनेटवर काव्या आणि ऋषभ पंत या दोघांच्या कथित प्रेमप्रकरणाचे रंगवून सांगितलेले किस्से व्हायरल होत असतात. पण काव्या मारन यांच्या लव्ह लाइफसंदर्भातील नेमक्या कोणत्या गोष्टी खऱ्या आणि कोणत्या खोट्या आहेत तेच आपण आज पाहणार आहोत.

8/14

Kavya Maran Love Life

ऋषभ पंत हा कायमच कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीबरोबर रिलेशन असल्याच्या मुद्द्यावरुन चर्चेत असतो. आधी ऋषभचं अभिनेत्री उर्वशी रौतेलाबरोबर नातं होतं अशी चर्चा होती. मात्र ही बाब केवळ गॉसीप असल्याचं नंतर स्पष्ट झालं.

9/14

Kavya Maran Love Life

काही काळापासून पंतचं नाव सनरायझर्सची मालकीण असलेल्या काव्या मारन यांच्याशी जोडलं जात आहे. मात्र हे वृत्तही खोटं आहे. दोघांनीही या कथित प्रेमप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. तसेच याबद्दल प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कोणते भाष्यही केलेलं नाही.

10/14

Kavya Maran Love Life

काही काळापूर्वी काव्या मारन यांचे प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रबरोबर रिलेशन असल्याची चर्चा होती. दोघांच्या रोमँटीक रिलेशनसंदर्भातील बातम्यांमुळे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला.  

11/14

Kavya Maran Love Life

मात्र अनिरुद्धने काव्याबरोबरच्या नात्याची बातमी फेटाळली होती. तसेच आम्हा दोघांमध्ये मैत्री वगळता काहीही नाही असंही अनिरुद्धने स्पष्टपणे सांगितलं होतं. अनिरुद्ध त्याच्या खासगी आयुष्यासंदर्भात चाहत्यांबरोबर फारश्या गोष्टी शेअर करत नाही.

12/14

Kavya Maran Love Life

सनरायझर्सच्या संघाची मैदानातील कामगिरी आणि त्यावर काव्या मारन यांची प्रतिक्रिया हे जणू समिकरणच झालं आहे. यंदाच्या पर्वामध्ये सालमीवीर अभिषेक शर्माच्या फलंदाजीमुळे काव्या यांच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं पाहायला मिळालं होतं. 

13/14

Kavya Maran Love Life

काव्या आणि अभिषेक यांच्या कथित लव्ह स्टोरीच्या बातम्याही इंटरनेटवर मागील काही आठवड्यांपासून पाहायला मिळाल्या. मात्र या बातम्याही अफवाच असल्याचं स्पष्ट झालं. दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.  

14/14

Kavya Maran Love Life

म्हणजेच काव्या मारन सध्या सिंगल आहे. काव्या सध्या कोणालाही डेट करत नसून त्यांचं सध्या त्या पूर्णपणे आपल्या उद्योगावर लक्ष केंद्रित करत आहेत.