मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया टीमचा पराभव केला. दोन्ही टीममध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका आयोजित करण्यात आली होती, ज्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम भारतात आली होती. ऑस्ट्रेलिया भारतात आली तेव्हा त्यांना विजयाची आशा होती, पण आता रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला आहे. 6 विकेट राखून टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने 9 वर्षानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध (austrailia) टी20 मालिका जिंकली आहे. टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) दृष्टीने टीम इंडियासाठी मोठा विजय आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 


Rohit Sharma-Virat Kohli सेलिब्रेशनचा व्हिडीयो व्हायरल


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात अनेक खेळाडू भारताच्या विजयाचं कारण होते. टीमसाठी शेवटच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर त्याने उत्तम चौकार मारून टीमला विजय मिळवून दिला. अखेरच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 11 रन्सची गरज होती.


या सामन्यात हार्दिकने जसा विजयी शॉट मारला तसं रोहित आणि कोहली दोन्ही दिग्गज खेळाडू लहान मुलांप्रमाणे आनंदोत्सव साजरा करताना दिसले. कोहलीने आनंदाने रोहितच्या मांडीवर मारले आणि नंतर त्याच्या पाठीवर थाप मारली, तर हिटमॅनने त्याला थेट मिठीच मारली. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे.



सूर्यकुमार यादव ठरला विजयाचा शिल्पकार


सुर्यकुमार (Surykumar yadav) सुरूवातीपासून फटकेबाजी करत होता. त्याने 36 बॉलमध्ये 69 रन्स केले.  त्याच्या या खेळीत त्याने 5 फोर आणि 5 सिक्स मारले. तर विराट कोहलीने (Virat Kohli) 48 बॉलमध्ये 63 रन्स केल्या. विराट आणि सुर्यकुमार आऊट झाल्यानंतर टीम इंडिया सामना गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हार्दीक पंड्या आणि कार्तिकने सामना जिंकून दिला.