Rahul Dravid : आयपीएल खेळून वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये यायचं असेल तर... राहुल द्रविड स्पष्टच बोलला
आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर याबाबत अनेक चर्चा होत्या की मोठ्या खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. अशातच तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचे मुख्य कोच राहुल द्रविडने यावर यावर भाष्य केलं आहे.
Rahul Dravid on IPl 2023 : भारतीय संघाचे महत्त्वाचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत (IPL 2023) खेळणार की नाही असा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून केला जात आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर याबाबत अनेक चर्चा होत्या की मोठ्या खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. अशातच तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचे मुख्य कोच राहुल द्रविडने यावर यावर भाष्य केलं आहे. (Rohit Sharma & Virat Kohli will play IPL or not Rahul Dravid spoke clearly IPL Latest Marathi News)
एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मधील भारतीय संघामधील जे महत्त्वाचे खेळाडू आहेत त्यांना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे. आयपीएलच्या फ्रँचायझींच्या संपर्कात एनसीए आणि आमची वैद्यकीय टीम संपर्कात असणार आहे. जर एखाद्या खेळाडूला काही दुखापत झाली असेल किंवा वेगळी काही अडचण असेल तर त्याला टूर्नामेंटमधून बाहेर करण्याचा अधिकार बीसीसीआयला असल्याचं राहुल द्रविड म्हणाला.
पूर्णपणे फिट असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धा खेळायला काही हरकत नाही. आयपीएल ही एक मोठी स्पर्धा असून पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटला प्राधान्य देणार आहे, असं द्रविडने सांगितलं. त्यामुळे आता स्टार खेळाडूंना आयपीएल खेळायची असेल तर दुखापतीपासून दोन हात दूर रहावं लागणार आहे. आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर टी-20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेसाठीही संघ व्यवस्थापन तयारी करत असल्याचं दिसत आहे. रोहित, राहुल आणि विराट यांनी कोणतीही टी-20 खेळली नाही.
दरम्यान, तसं पाहायला गेलं तर आता भारताचे प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा टी-20 वर्ल्ड कप, आशिया कपमध्ये खेळले नाहीत. दुखपतीमुळे खेळू न शकलेले मोठे खेळाडू आता आयपीएल आल्यावर फिट होत असल्याचं दिसत आहे. जडेजाही रणजी खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे बुमराहनेही एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यामुळे क्रीडा चाहत्यांनी त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.