Asia Cup 2023 : क्रिझवर असताना कोहलीसोबत काय बोलणं होतं? हिटमॅनने स्वतः केला मोठा खुलासा
Asia Cup 2023 : रविवारी होणाऱ्या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एका इंटरव्ह्यू दरम्यान मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने क्रिझवर कोहलीसंदर्भातील एक सिक्रेट शेअर केलं आहे.
Asia Cup 2023 : कोलंबोमध्ये रविवारी भारत विरूद्ध पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पावसाने खेळ केल्याने सामना रद्द झालाय. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एका इंटरव्ह्यू दरम्यान मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने क्रिझवर कोहलीसंदर्भातील एक सिक्रेट शेअर केलं आहे.
विराट आणि रोहित कोणत्या विषयावर चर्चा करतात?
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, मी आणि विराट कोहली दोघेही फलंदाजी, टीम तसंच गोलंदाजांबद्दल खूप चर्चा करतो. क्रीझवर असताना कोहलीसोबत गोलंदाजी कोणी करायची याबाबत चर्चा होत असते. आम्ही दोघंही गोष्टी सिरीजनुसार पाहतो. 2020-21 साली गाबामध्ये भारतीय टीमने जिंकलेला टेस्ट सामना माझ्या मते टीम इंडियाने ( Team India ) आतापर्यंत खेळलेला सर्वोत्तम टेस्ट सामना होता.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला, मला ख्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधित सिक्स मारण्याचा विक्रम मोडायचा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच गेलचा विक्रम मोडेल याची कल्पनाही केली नसेल. हे माझ्यासाठी मजेदार असेल. मी पॉवर हिटर प्रकार नसून क्लास आणि टायमिंगवर लक्ष केंद्रित करणारा फलंदाज आहे.
पंतला त्याची मानसिकता बदलण्याची गरज नाही
अपघातातून सावरत असलेला आणि टीम इंडियापासून दूर असलेल्या ऋषभ पंतविषयी बोलताना रोहित म्हणाला, आतापर्यंतच्या कारकिर्दीत तो ज्या पद्धतीने खेळलाय त्याच पद्धतीने त्याने खेळलं पाहिजे. आणि त्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलू नये, अशी माझी इच्छा आहे.
सिक्सचा रेकॉर्ड
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर कायम आहे. 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गेलच्या नावावर एकूण 553 सिक्सेची नोंद आहे. तर दुसरीकडे, रोहितच्या नावावर 446 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 539 सिक्स मारण्याची कामगिरी रोहितने केली आहे. त्यामुळे यंदाच्या एशिया कपमध्ये 14 सिक्स रोहितने मारले तर तो ख्रिस गेलचा बलाढ्य रेकॉर्ड मोडू शकतो.