Rohit Sharma: कौतुक करायला आलेल्या रोहितला गोलंदाजाने केलं इग्नोर; MI खेळाडूंकडून हिटमॅनला का मिळतेय अशी वागणूक?
Rohit Sharma: इंडियन प्रिमीयर लीगमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 168 रन्स केले. यावेळी मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर फेकली.
Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलच्या 17 व्या सिझनमधील 5 वा सामना खेळवण्यात आला. गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये हा सामना खेळवला गेला. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या सिझनमधील हा पहिलाच सामना होता. याशिवाय रोहित शर्मा नव्हे तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचाही मुंबईचा पहिला सामना होता. दरम्यान या सामन्यात चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माला हार्दिक पंड्याकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. अशातच टीमच्या एका खेळाडूने रोहितला इग्नोर केल्याचं पहायला मिळालं.
इंडियन प्रिमीयर लीगमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 168 रन्स केले. यावेळी मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर फेकली. या ओव्हरमध्ये हार्दिकने तब्बल 11 रन्सचं वाटप केलं. यानंतर इंग्लंडचा गोलंदाज ल्यूक वूडने दुसऱ्या बाजूची कमान घेतली. ल्यूक वुडने डावातील दुसरी ओव्हर टाकली. याचवेळी रोहित शर्मासोबत ही घटना घडली असून ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वुडने रोहित शर्माला केलं इग्नोर
मुंबई इंडियन्ससाठी ल्यूक वुड दुसरी ओव्हर टाकत होता. यावेळी चौथ्या बॉलदरम्यान रोहित शर्मा चांगला बॉल टाकण्यासाठी त्याच्याकडे धावत येताना दिसला होता. रोहित त्याला कौतुकाची थाप देण्याआधीच ल्यूक वुडने तोंड फिरवलं आणि दुसऱ्या बाजूला गेला. इतकंच नाही तर वुडने यावेळी मागे वळूनही पाहिले नाही. वुडच्या या कृत्याने सोशल मीडियावर चाहते मात्र चांगलेच संतापले आहेत.
हार्दिक पंड्यानेही केला रोहितचा अपमान?
मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हार्दिक मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डींगच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत पळवताना दिसतोय. व्हिडिओमध्ये पहिलं तर रोहित शर्मा दुसऱ्या फिल्डिंग पोझिशनवर धावताना दिसतोय. यावेळी रोहित त्याच्या स्थानावर पोहोचतो, मात्र लगेच हार्दिक त्याला जागा बदलण्यास सांगतो. यावेळी रोहित शर्मा पंड्या सांगत असलेल्या दुसऱ्या स्थानावर जातो. हार्दिक पंड्याच्या सांगण्यावरून रोहित शर्माची सुरु असलेली ही धावपळ चाहत्यांना अजिबात आवडलेली नाही.