मुंबई : टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि जगातील तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरतो. दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका गमावल्यानंतर त्याने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीमचा सलामीवीर रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलीये. सध्या रोहित शर्मा तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार असून त्याची विजयी घौडदौड सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून माजी खेळाडू वसिम जाफर याने खळबळजनक विधान केलं आहे. वसिम जाफरच्या म्हणण्याप्रमाणे, रोहित शर्मा हा अतिशय स्ट्रॅटेजिक खेळाडू असून तो विराटपेक्षा चांगला कर्णधार असल्याचं सिद्ध होईल. 


जाफर म्हणाला, अलीकडे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टेस्ट सिरीजमध्ये रोहित शर्मा निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये कुशल खेळाडू असल्याचं दिसून आलं. त्यामुळे प्रत्येकजण त्याचं कौतुक करतोय.


भारताचा माजी सलामीवीर आणि टेस्ट फलंदाज वसीम जाफरनेही रोहितचं कौतुक केलंय. जाफरला विश्वास आहे की. रोहित माजी कर्णधार विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार सिद्ध होईल. क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोच्या एका चॅट शोमध्ये जाफरने हे विधान केलं आहे.


जाफर पुढे म्हणाला, रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा चांगला टेस्ट कर्णधार होऊ शकतो. तो किती काळ कर्णधार असेल याबाबत मला माहित नाही. मला असं वाटतं की, तो उत्तम कर्णधारांपैकी एक आहे आणि दोन्ही मालिकेत त्याने समोरच्या टीमला कसं नमवलं आपण पाहिलं. त्यामुळे कर्णधारपद योग्य कर्णधाराच्या हाती झाल्याचं स्पष्ट झालं आहे.