Arjun Tendulkar: रोहित शर्मा अर्जुनला टीममध्ये संधी का देत नाहीये? `हे` आहे कारण!
Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्समध्ये अर्जुनला का गेल्या 2 सामन्यांपासून संधी देण्यात आलेली नाही. यामागे काय कारण असू शकतं हे पाहूया.
Arjun Tendulkar: बुधवारी आयपीएलमध्ये (IPL 2023) मोहालीच्या मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईच्या टीमने वानखेडेच्या मैदानावर (Wankhede Stadium) झालेल्या पराभवाचा बदला घेतला. सूर्या आणि इशानच्या उत्तम खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) टीममध्ये संधी मिळाली नाही. पंजाबपूर्वी मुंबईचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत (Rajasthan Royals) झाला होता. त्या सामन्यात देखील अर्जुनला संधी देण्यात आली नव्हती.
2 पराभवानंतर मुंबईने दणक्यात कमबॅक करत 2 विजय देखील मिळवले. मात्र तरीही चाहत्यांच्या मनात अजून हा प्रश्न आहे की, चांगली कामगिरी करून अर्जुननला टीममध्ये संधी का देण्यात आली नाही.
अर्जुनला मुंबईच्या टीममध्ये संधी का नाही?
बुधवारी पंजाबने मुंबईला जिंकण्यासाठी 215 रन्सचं आव्हान दिलं होतं. मुंबईच्या टीमने 4 विकेट्स गमावत हे लक्ष्य गाठलं. मात्र यापूर्वी 22 एप्रिल रोजी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात लढत झाली होती. त्या सामन्यात पंजाबने दिलेल्या 214 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आले. याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीच्या बाबतीत चांगलाच महागात पडला होता.
22 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून 16 वी ओव्हर टाकली होती. या ओव्हरमध्ये अर्जुनने एकूण 31 रन्स दिले होते. त्यामुळे कदाचित अर्जुनचं टीमबाहेर जाण्याचं हेच मोठं कारण असल्याचं मानलं जातंय.
वानखेडेच्या मैदानावर झालेल्या पंजाबविरूद्धच्या सामन्यात करनने अर्जुनच्या एका ओव्हरमध्ये 31 रन्स केले. यामुळे पंजाबचा स्कोर 213 पर्यंत गेला. अखेरीस हेच मुंबईच्या पराभवाचं कारण ठरलं. दरम्यान मुंबईची टीम अजून टॉप 4 मध्ये पोहोचली नसल्याने येणारे सर्व सामने मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत. हीच बाब लक्षात घेता, अर्जुनसारखा कमी अनुभवी गोलंदाज टीमसाठी घातक ठरू शकतो, असा विचार रोहित शर्माने केला असावा. त्यामुळे रोहित अर्जुनला टीममध्ये संधी देत नसावा. त्यामुळे आता अर्जुनला पुन्हा मुंबई इंडियन्सकडून संधी मिळणार का? हे पहावं लागणार आहे.
कसं आहे अर्जुनचं आयपीएलमधील प्रदर्शन?
कोलकात्या विरूद्धच्या सामन्यात अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केलं होतं. या सामन्यातमध्ये अर्जुनने केवळ 2 ओव्हर टाकल्या होत्या. यानंतर सनायझर्सविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने स्वतःच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेत मुंबईला विजय मिळवून दिला होता. आतापर्यंत अर्जुनने 4 सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतलेत.