Rohit Sharma: मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही रोहित? प्रॅक्टिससाठी टीममध्ये सामील झाला नाही हिटमॅन
Rohit Sharma Not Joined Mumbai Indians Camp: मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांनी आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलंय. आता सर्वांचे लक्ष पुढील आयपीएल विजेतेपदाकडे लागलंय. ज्यासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलंय.
Rohit Sharma Not Joined Mumbai Indians Camp: येत्या 22 तारखेपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यामध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये होणार आहे. दरम्यान यावेळी अनेक खेळाडू भारतात आले असून त्यांनी प्रॅक्टिसही सुरु केली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अर्जुन तेंडुलकर यांनी प्रॅक्टिस सुरु केली आहे. मात्र सर्वांच्या मनात प्रश्न आहे की, रोहित शर्मा कधी सामिल होणार?
रोहित शर्मा बनतोय चर्चेचा विषय
मुंबई इंडियन्सने आयपीएलपूर्वी टीममध्ये मोठा बदल केला. यावेळी टीमच्या कर्णधारपदी रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपद देण्यात आलंय. त्यामुळे या सिझनमध्ये सर्वांचं लक्ष रोहित शर्मावर असणार आहे. कर्णधारपदावरून काढून टाकल्याने रोहित शर्मा सध्या चर्चेवा विषय बनला आहे. जवळपास सर्वच खेळाडू 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससोबत सराव करतायत. मात्र रोहित शर्माचा इंग्लंड टेस्ट सिरीजनंतर अद्याप समजू शकलेला नाही.
अजून टीमसोबत जोडला गेला नाही रोहित
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांनी आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावलंय. आता सर्वांचे लक्ष पुढील आयपीएल विजेतेपदाकडे लागलंय. ज्यासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलंय. फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे चाहतेच नाही तर रोहित शर्माही नाराज असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान मंगळवारी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम सराव करताना दिसला. पण रोहित शर्मा कुठेच दिसला नाही. यामुळे रोहित शर्माच्या नाराज असल्याचा दावा केला जातोय. ( झी 24 तास या दाव्याला सत्य मानत नाही ). मंगळवारी रोहितला वानखेडे मैदानावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी रोहित शर्मा रणजी ट्रॉफीची फायनल पाहण्यासाठी गेला होता.
हार्दिकची मुंबई इंडियन्सच्या कॅम्पममध्ये अनोखी एन्ट्री
हार्दिक पांड्या नुकताच मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत जोडला गेला आहे. त्याने टीमच्या कॅम्पमध्ये एन्ट्री करताच मुंबईचे हेड कोच मार्क बाउचर यांनी हार्दिकला घट्ट मिठी मारली आणि त्याचं जंगी स्वागत केलं. यानंतर हार्दिकने सर्वात आधी देवाचे आशिर्वाद घेतले यासोबतच मुंबईचे हेड कोच मार्क बाउचर यांनीदेखील देवासमोर नारळ फोडत देवाच्या पाया पडले. मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पांड्याच्या हाती सोपवण्यात आलेली आहे.