मुंबई : वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने कमबॅक करत तुफान फलंदाजी केली. दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन यांच्या एका फोटोने सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली आहेत. एकदिवसीय मालिकेनंतर आता वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर पहिल्या सामन्यात दोन्ही टीम आमनेसामने आल्या होत्या. त्यापूर्वी टॉसच्या दरम्यान रोहित शर्मा आणि निकोलस पूरन यांचा फोटो काढण्यात आला होता. ज्याने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


रोहित शर्मा आणि निकोलस पूरनच्या फोटोने जिंकलं मन


वेस्ट इंडिज विरुद्ध भारत सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात आले होते. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यजमान टीमचा कर्णधार निकोलस पूरनच्या खांद्यावर हात ठेवून अभिनंदन करताना दिसला. तर दुसरा हात छातीवर ठेवला आहे.


दोन्ही कर्णधारांच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळतेय. रोहित शर्माने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं चाहते कौतुक करत आहेत. यासोबतच स्पिरिट ऑफ क्रिकेटच्या कॅप्शनसह हा फोटोही आयसीसीने शेअर केला आहे.



टीम इंडियाची विजयी सलामी


टीम इंडियाने T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 68 रन्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात टीमच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार रोहित शर्मा, ज्याने 64 धावांची जबरदस्त इनिंग खेळली. टीम इंडियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 190 रन्स केले. मात्र वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये केवळ 122 रन्स केले. आता पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये.