Rohit Sharma : रोहित शर्माची मनमानी सुरु? प्रॅक्टिस दरम्यान Yashasvi Jaiswal ला शिवीगाळ? VIDEO व्हायरल
Rohit Sharma : टीम इंडियाच्या ( Team India ) वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. रोहितने ( Rohit Sharma ) यशस्वी जयस्वालला ( Yashasvi Jaiswal ) अपशब्द वापरल्याचं दिसतंय.
Rohit Sharma : टीम इंडियाच्या ( Team India ) वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( WI vs IND ) यांच्यात पहिला टेस्ट सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंनी मैदानावर प्रॅक्टिस केली. यावेळी टीमचा कर्णधार रोहित शर्मा मस्करीच्या मूडमध्ये दिसून आला. अशातच मस्करीच्या अंदाजात रोहितने ( Rohit Sharma ) यशस्वी जयस्वालला ( Yashasvi Jaiswal ) अपशब्द वापरल्याचं दिसतंय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
रोहितकडून जयस्वालला शिवीगाळ?
वेस्ट इंडिज आणि भारत (WI vs IND) यांच्यातील टेस्ट सिरीजला सुरुवात झाली असून एक दिवस आधी, भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा इंटरव्ह्यू घेतला. हा इंटरव्ह्यू मैदानावर घेण्यात आला आणि सर्व पत्रकार टीम इंडियाचा कर्णधार आणि उपकर्णधार यांच्याशी मॅचबद्दल बोलताना दिसले.
यावेळी एकीकडे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. तर दुसरीकडे रोहित शर्मा ( Rohit Sharma ) प्रचंड मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. यावेळी त्याने मैदानावर सराव करणाऱ्या युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात येतोय. प्रॅक्टिसदरम्यान घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
रोहितची ही पहिली वेळ नव्हे...
मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, रोहित शर्मा ( Rohit Sharma ) अनेकदा मजेशीर मूडमध्ये दिसून येतो. मैदानावरही अनेकदा तो इतर खेळाडूंना शिवीगाळ करताना दिसतो. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रॅक्टिस दरम्यान यशस्वी जयस्वालला अपशब्द वापरताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दिला. या व्हिडीओवरून असा अंदाज लावला जातोय की, एका चुकीच्या शॉटवरून तो जयस्वालला बोलतोय.
जयस्वाल करणार डेब्यू?
यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL ) यशस्वी जयस्वालने उत्तम कामगिरी केली. यानंतर वेस्ट इंडिजविरूद्धच्या दौऱ्यावर त्याची निवड करण्यात आली. पहिल्या सामन्यात जयस्वाल डेब्यू करण्याची शक्यता असून तो रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. तर चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल फलंदाजी करताना दिसणार आहे.