नवी दिल्ली : ४,०,११,५,५,०,०,४,४,४ हा कोणताही फोन नंबर नाही आहे. तर हे आहे टीम इंडियातील एक दिग्गज बॅट्समनचे रन. जे त्याने श्रीलंकेत खेळलेल्या गेल्या १० वनडे मॅचमध्ये केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि या खेळाडूचं नाव ऐकून तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही. एका अशा खेळाडूचे हे आकडे आहेत ज्याने वन डे क्रिकेटमध्ये दोनवेळा शतक पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. तुमचा गेस अगदी बरोबर आहे. हा खेळाडू आहे रोहित शर्मा. 


रोहित शर्माला सूट होत नाही श्रीलंका



रोहित शर्माने श्रीलंकेत खेळलेल्या मागील १० वन डे मॅचमध्ये फक्त आणि फक्त ३७ धावा केल्या आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की, रोहित शर्माने या १० वन डे मध्ये फक्त एकदाच १० अंकी पार करून रन केलेले आहेत. एवढंच नाही तर या १० सामन्यात त्याने तीन वेळा आपलं खातंच ओपन केलेलं नाही. विश्वास बसत नाहीत पण हे आकडे खरे आहेत. 


रोहित शर्माचे हे आकडे जर न्यूझीलंड, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असते तर आपण समझू शकलो असतो की तेथील खराब वातावरणामुळे हा निकाल पाहायला मिळत आहे. मात्र टीम इंडियाच्या हिटमॅनचे हे आकडे श्रीलंकेतील आहेत यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. 


रोहितसाठी अनलक्की आहे श्रीलंका 



शिखर धवनने ज्या पिचवर वनडे करिअरमधील सर्वात फास्ट शतक पूर्ण केलं तिथेच रोहित शर्मा मात्र याचं आकड्यांवर आऊट झाला. मात्र भारत श्रीलंका वन डे सिरीजमध्ये रोहित शर्माकडे नशिबाची साथ नव्हती. अगदी सामान्य रन काढून तो तंबूत परतताना दिसत होता.