रांची : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी रांचीमध्ये दुसरा टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान असं काही घडलं की, सोशल मीडियावर त्याच्या चर्चा होतायत. भारतीय संघ फिल्डींग करत असताना, त्यावेळी मैदानावरील एका फॅनने सुरक्षा फेरा तोडून आत प्रवेश केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांचीमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या T-20 सामन्यात भारतीय टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया जेव्हा फिल्डींग करत होती, त्याचवेळी हा व्यक्ती मैदानात आली.



हा व्यक्ती मैदानात गेल्यानंतर थेट रोहित शर्मापर्यंत पोहोचला आणि त्याच्या पाया पडला. मागून सुरक्षा कर्मचारी आल्यावर रोहित शर्माने त्यांना थांबवलं आणि त्या व्यक्तीला आरामात बाहेर नेण्यास सांगितलं.


रोहित शर्मा हे सध्या भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. गेल्या काही वर्षात रोहित शर्माचा दर्जा सातत्याने वाढताना दिसतोय. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल खूप क्रेझ आहे.



विराट कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार झालाय. एवढंच नाही तर वनडे फॉरमॅटमध्येही रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात रोहितचा दर्जा आणखी वाढू शकतो. 


टी-20 फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक रन्स करण्याच्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 4 शतकं आहेत, जी कोणत्याही फलंदाजासाठी सर्वाधिक आहेत.