रोहितला माझ्या सल्ल्याची गरज...; कर्णधारपद मिळताच Hardik Pandya अहंकारी झालाय का?
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच हार्दिक पंड्याने रोहित शर्माविषयी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात.
Hardik Pandya on Rohit Sharma : टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ने त्याच्या कर्णधारपदाच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. बांगलादेशानंतर श्रीलंकेमध्ये झालेली टी-20 सिरीज देखील त्याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली. मात्र त्यानंतर आता टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच हार्दिक पंड्याने रोहित शर्माविषयी केलेल्या एका विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात.
सध्या रोहित शर्मा वनडे सिरीजमध्ये टीमचं नेतृत्व करतोय. श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 67 रन्सनी तर दुसऱ्या वनडेमध्ये 4 विकेट्सने विजय झाला. दरम्यान दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी टीमचा उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबत मोठं आणि विचित्र विधान केलं आहे.
काय म्हणाला Hardik Pandya?
हार्दिक पंड्या याच्या म्हणण्यानुसार, "रोहित शर्मा (Rohit Sharma) परत आल्याने मला आराम मिळतोय. त्यामुळे मी आता स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकतो. रोहितला माझ्या मदतीची किंवा सल्लाची गरज असेल, तर मी नेहमीच त्यासाठी उपलब्ध असेन."
दरम्यान हार्दिक पंड्याच्या या वक्तव्याने सर्वजण त्याला घमेंड चढला असल्याचं म्हटलंय. याशिवाय त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलंय.
दुसऱ्या वनडेत भारताचा विजय
कोलकात्यामध्ये श्रीलंका विरूद्ध भारत यांच्यात दुसरा वनडे सामना रंगला होता. 4 विकेट्सने टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने वनडे सिरीज देखील जिंकली आहे. श्रीलंकेच्या टीमने दिलेलं 216 रन्सचं आव्हान टीम इंडियाला सहजरित्या पूर्ण करता आलं नाही. 6 विकेट्स गमावत भारताने 43.2 ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण केलं.
केएल राहुलची उत्तम फलंदाजी
आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियाकडून केएल राहुलने सर्वाधिक रन्स केले. भारताचे विकेट्स पडत असताना केएल राहुलने उत्तम फलंदाजी केली. राहुलने 103 बॉल्समध्ये 64 रन्सची खेळी करत टीमला विजय मिळवून दिला आहे. आजच्या त्याच्या खेळात 6 चौकारांचा समावेश आहे.
टीम इंडियाचे बाकी फलंदाज ढेर
केएल राहुल सोडून टीम इंडियाच्या इतर कोणत्याही खेळाडूला चांगला खेळ करता आला नाही. हार्दिक पंड्या 36 तर श्रेयस अय्यरने 28 रन्स करत राहुलची साथ दिली. मात्र आजच्या सामन्यात भारताचे दोन्ही ओपनर शुभमन गिल आणि रोहित शर्मा फेल ठरले. याशिवाय विराट कोहलीला देखील साजेसा खेळ करता नाही.