Rohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?
IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. यावेळी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवत असताना एक मजेशीर घटना घडली.
IPL 2024: मुंबई इंडियन्सचा गेला सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळवण्यात आला होता. या सामन्यात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजासाठी मैदानात आलेला दिसला. या सामन्यादरम्यान पाऊस आल्याने ओव्हर्समध्ये घट करण्यात आळी आणि 20 ऐवजी 16 ओव्हर्सचा सामना खेळण्यात आला. दरम्यान या सामन्यात एक मजेदार घटना घडल्याचं दिसून आलं. ही घटना माजी कर्णधार रोहित शर्मासोबत घडली असून पाहूयात नेमकं काय झालंय.
कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. यावेळी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवत असताना एक मजेशीर घटना घडली. रोहितला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आणण्यासाठी पियुष चावलालाही खूप त्रास सहन करावा लागला. या सामन्यात केकेआरने 18 रन्सने विजय मिळवला होता.
मैदानात रोहित शर्मासोबत घटना मजेशीर किस्सा
जसप्रीत बुमराह एमआय विरुद्ध केकेआर सामन्यातील 16 वी ओव्हर टाकणार होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये डग आऊटमध्ये बसलेला रोहित शर्मा कर्णधार हार्दिक पांड्याला ओरडून सांगत होता. यावेळी त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात बोलावलं पाहिजे होतं. जेव्हा रोहित शर्मा मैदानात आला होता, पण स्वत:ला सब्स्टिट्यूट समजून पियुष चावला मैदानाबाहेर गेला. अशा स्थितीत ग्राऊंड अंपायरने चावलाला पुन्हा मैदानात बोलावलं. या सर्व प्रकरणामुळे एमआय कॅम्पमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मुंबईच्या कोचची अंपायरशी चर्चा
एमआयचे मुख्य कोच मार्क बाउचरही यावेळी अंपायरशी चर्चा करण्यासाठी मैदानात आले होते. या सर्व घटनेनंतर लक्षात आलं की, रोहित शर्माच्या जागी पियुष चावलाला नाही, तर वेगवान गोलंदाज नुवान तुषाराच्या जागी मैदानात येणार आहे. रोहित सुद्धा हा सगळा प्रकार बघत उभा राहिला होता.
मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीमला केवळ 4 विजय नोंदवण्यात यश आलं आहे. मुंबईची टीम 8 पॉईंट्ससह 9 व्या क्रमांकावर आहे आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाणं आता अशक्य झालंय. मुंबईचा शेवटचा सामना 17 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे.