Instagram Live दरम्यानच खेळाडूनं विवस्त्र होत सुरू केली अंघोळ
खेळाडूची सिक्स पॅक बॉडी पाहून तरुणी झाल्या घायाळ... LIVE अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई : सोशल मीडियावर अभिनेत्री ओपन शॉवर करतानाचे फोटो शेअर करतात. यामुळे कधी त्या ट्रोल होतात तर कधी चर्चेत येतात. मात्र चक्क एका खेळाडूला LIVE सुरू असताना अंघोळ करण्याची हुक्की आली.
क्रिकेटर, खेळाडू आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स आपल्या चाहत्यांपर्यंत सोशल मीडियावरून देत असतात. चक्क एका खेळाडूनं अंघोळीचा व्हिडीओच लाईव्ह केला आणि एकच खळबळ उडाली.
खेळाडूची सिक्स पॅक बॉडी पाहून त्याच्यावर तरुणी पुरत्या घायाळ झाल्या. रोनाल्डो असं या खेळाडूचं नाव आहे. चक्क रोनाल्डोनं इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान अंघोळ केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतके दिवस आपल्या खराब फॉर्ममुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेला रोनाल्डो आता अंघोळीमुळे चर्चेत आला.
लाईव्हच्या शेवटी रोनाल्डो आपल्या फॅन्सना किस देताना दिसत आहे. काही लोकांनी रोनाल्डोला अंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर करू नये असा सल्ला दिला आहे. 400 मिलियन्सहून अधिक रोनाल्डोचे फॉलोअर्स आहेत. सध्या रोनाल्डो त्याच्या LIVE अंघोळीमुळे चर्चेत आहे.