अॅडलेड : इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं किल्ला लढवल्यामुळे दुसरी अॅशेस टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. पाचव्या म्हणजेच अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी १७८ रन्सची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं १७६/४ एवढा स्कोअर केला आहे. दिवसाअखेरीस जो रुट नाबाद ६७ रन्सवर तर क्रिस वोक्स नाबाद ५ रन्सवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कनं दोन तर लायन आणि कमिन्सनं प्रत्येकी एक विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ४४२ रन्स केल्यानंतर इंग्लंडला २२७ रन्सपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २१५ रन्सचा लीड मिळाला. पण मॅचच्या तिसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बॉलर्सनी कमबॅक केलं आणि ऑस्ट्रेलियाला १३८ रन्सवर ऑल आऊट केलं.


इंग्लंडच्या जेम्स अंडरसननं पाच विकेट घेतल्या. तर क्रिस वोक्सला ४ आणि ओव्हरटनला एक विकेट घेण्यात यश आलं. या सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर १० विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला होता.