WPL 2023 UP vs RCB : रॉयल चॅलेंजर बंगळूरूने (Royal Challengers Bangalore) अखेर सिझनमधील पहिला विजय आज मिळवला. आरसीबीच्या महिलांनी 5 विकेट्सने युपी वॉरियर्सचा (UP Warriorz) पराभव केला. या विजयामुळे आरसीबीच्या सलग 5 सामन्यांच्या पराभवाची मालिका संपुष्टात आली आहे. आरसीबीच्या या विजयाची खरी शिल्पकार कनिका आहुजा ठरली आहे.


आरसीबीचा पहिला विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युपी वॉरियर्सच्या महिलांनी आरसीबीला अवघ्या 136 रन्सचं आव्हान दिलं होतं. यामध्ये 18 ओव्हर्समध्ये आरसीबीने हे आव्हान पूर्ण केलं आहे. यामध्ये कनिका आहुजाने 46 रन्सची प्रमुख खेळी केली. तिच्या या खेळीमध्ये 8 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. याशिवाय रिचा घोषने 31 आणि हीथर नाइटने 24 रन्सची खेळी केली.


युपीच्या महिलांची खराब फलंदाजी


रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या महिलांनी प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला. युपीच्या फलंदाजांचा अवघ्या 135 रन्समध्ये ऑल आऊट झाला. युपीकडून ग्रेस हॅरिस हिने सर्वाधिक म्हणजेच 46 रन्सची खेळी केली. तर दिप्ती शर्मा आणि किरण किरण नवगिरे या दोघांनी प्रत्येकी 22 रन्स केले.


आरसीबीच्या गोलंदाजांची कमाल


आरसीबीच्या गोलंदाजीसमोर आज युपीच्या महिलांनी गुडघे टेकले. यावेळी एलिस पेरीने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स काढले. सोफी डिवाइन आणि आशा शोभना यांनी दोन-दोन विकेट्स घेतले. तर मेगन शुट आणि श्रेयंका पाटील यांना एक-एक विकेट घेण्यात आलं आहे.


यूपी वॉरियर्सची प्लेईंग 11


 एलिसा हीली (कर्णधार/विकेटकीपर), देविका वैद्य, किरण नवगिरे, ग्रेस हैरिस, ताहलिया मैक्ग्रा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, दीप्ति शर्मा, श्वेता सहरावत, अंजलि सरवानी, राजेश्वरी गायकवाड़


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची प्लेईंग 11


स्मृति मंधाना (कर्णधार), सोफी डिवाइन, एलिस पैरी, हीथर नाइट, ऋचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, दिशा कसात, मेगन शुट, आशा शोभना, रेणुका ठाकुर सिंह, कनिका आहूजा