RCB vs LSG: विराटशी भिडणार गंभीरची सेना; पाहा कशी आहे Playing XI
Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (IPL 2023) आरसीबीने ज्या खेळपट्टीवर खेळले होते तीच खेळपट्टी आहे. आजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी प्रभावी राहिली होती. या सामन्यासाठी (RCB vs LSG) खेळपट्टीही अशीच खेळण्याची शक्यता आहे.
RCB vs LSG, IPL 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा 15 वा सामना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ सुपर जायन्ट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळवला जाणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यामुळे आता आयसीबीचे (RCB) फॅन्स उत्सुक असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे पहिल्या पराभवानंतर आता सलग दोन विजय नोंदवण्याची तयारी बंगळुरूचा संघ करणार आहे. (Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants See how is the Playing XI IPL 2023 News)
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने ज्या खेळपट्टीवर खेळले होते तीच खेळपट्टी आहे. आजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी प्रभावी राहिली होती. या सामन्यासाठी खेळपट्टीही अशीच खेळण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज आणि करण शर्मा यांच्या कामगिरीवर आज खास लक्ष असणार आहे. मागील वर्षात दोन्ही संघात झालेल्या सामन्यात आरसीबीने (RCB vs LSG) लखनऊला दोन्हीवेळा हारवलं आहे.
लखनऊने टॉस जिंकला असून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. (RCB vs LSG Toss)
कसा असेल लखनऊचा संघ? (Lucknow Super Giants Playing XI)
केएल राहुल (C), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (WC), जयदेव उनाडकट, अमित मिश्रा, आवेश खान, मार्क वुड, रवी बिश्नोई.
कसा असेल बंगळूरूचा संघ? (Royal Challengers Bangalore Playing XI)
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (WC), अनुज रावत, डेव्हिड विली, वेन पारनेल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.