मुंबई : दिल्लीविरूद्ध मुंबईच्या विजयानंतर आरसीबीचा संघ कसाबसा प्लेऑफमध्ये पोहोचलाय. आता संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचून फायनल जिंकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र हा प्रवास सोपा नसणार आहे. कारण समोर मोठ्या तगड्या टीम असणार आहेत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्ससाठी प्लेऑफची लढाई अवघड असणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तसे पाहता संघाचा अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग कठीण असणार आहे. आरसीबी २५ मे रोजी एलिमिनेटर सामन्यात लखनऊशी भिडणार आहे. हा सामना जिंकल्यानंतरच आरसीबीला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.


दरम्यान आरसीबी प्लेऑफसाठी सज्ज झाली असताना विराट कोहलीने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो इतर खेळाडूसोबत दिसतो आहे. या फोटोला त्याने 'टच डाउन कोलकाता' म्हणजेच कोलकत्तामध्ये पोहोचल्याची माहिती मिळत आहे.  



कोहलीची कामगिरी 
आयपीएलमध्ये कोहलीने 309 धावा केल्या आहेत. हा हंगाम विराटसाठी काहीसा खास ठरला नाही आहे. मात्र 
गुजरात टायटन्सविरुद्धच्या संघाच्या अखेरच्या साखळी सामन्यात कोहली ७३ धावा करून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. विराटला आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने 309 धावा करता आल्या आहेत. यादरम्यान, तीन वेळा तो गोल्डन डकचा बळी ठरला (पहिल्या चेंडूवर बाद).


प्लेऑफचे सामने 
क्वालिफायर 1: 24 मे- गुजरात टाइटंस vs राजस्थान रॉयल्स, कोलकाता
एलिमिनेटर: 25 मे, लखनऊ सुपर जायंट्स vs रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु, कोलकाता
क्वालिफायर 2: 27 मे, एलिमिनेटर विजेता vs क्वालिफायर-1  पराभूत टीम, अहमदाबाद