CSK vs RR Playing 11 : आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) हंगामात आजचा (27 एप्रिल 2023) 37 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. राजस्थान रॉयल्सने या हंगामात सातपैकी चार सामने जिंकून दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या टेबल पाँइंटनुसार राजस्थान तिसऱ्या स्थानी आहे. तर दुसरीकडे पहिल्या स्थानी कायम राहण्यासाठी एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईचा विजय होणार की राजस्थान बाजी मारणार (CSK vs RR Playing 11) हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएसच्या (IPL 2023) या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) सातपैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल केकेआरने 20 षटकांत 8 गडी गमावून 186 धावा केल्या. सीएसकेने हा सामना 49 धावांनी जिंकला.


वाचा : रोहित शर्माचा फॉर्म सुधरेना, लिटिल मास्टर म्हणतात...


तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही आणि सात धावांनी सामना गमावला. ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीने प्रत्येकी एक विकेट घेतली. जर चेन्नईने आजचा सामना जिंकला तर ते प्ले-ऑफसाठी आपला दावा मांडेल. राजस्थानचा विजय संघाला बळ देईल.


असा असेल खेळपट्टीचा अहवाल 


जयपूरच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंसाठी फायदेशी ठरू शकते. आतापर्यंत या खेळपट्टीवर फारसे सामने झालेले नाहीत. मात्र दोन्ही संघांचे फिरकी गोलंदाज फलंदाजांना अडचणीत आणू शकतात हे स्पष्ट झाले आहे.


हेड टू हेड रेकॉर्ड


आयपीएलच्या इतिहासात राजस्थान आणि चेन्नई संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या 15 सामन्यांमध्ये चेन्नई संघामुळे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. तर राजस्थानने चेन्नई संघाला 12 सामन्यात पराभूत केले.


दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 


राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (क), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, संदीप शर्मा, अॅडम झम्पा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.


चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (क), तुषार देशपांडे, महेश तिक्षना, मथिशा पाथीराना, आकाश सिंग.