मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 44 वा सामना राजस्थान (Rajsthan Royals) विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईने टॉस जिंकला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. (rr vs mi ipl 2022 mumbai indians win toss and elect to bowl against rajsthan royals)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माचा 35 वा वाढदिवस आहे. त्यामुळे या विशेष दिवशी रोहित मुंबईला कॅप्टन म्हणून पहिला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 


मुंबईला या मोसमात सलग 8 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या मोसमातील नवव्या सामन्यात मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे.


राजस्थानची प्लेइंग इलेव्हन :


संजू सॅमसन (कर्णधार), जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, डॅरिल मिचेल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन. 


मुंबईची प्लेइंग इलेव्हन : 
 
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.