IPL 2024 : रूक ना *** सास तो लेने दे...! भर सामन्यात विराट कोहलीने केली हरप्रीत ब्रारला शिवागाळ? Video व्हायरल
Virat Kohli vs Harpreet Brar : विराट कोहलीने युवा गोलंदाज हरप्रीत ब्रारला हळू ओव्हर करण्याची तंबी दिल्यानंतर पुढच्याच बॉलवर ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) विकेट उडाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Virat Kohli Viral Video : आरसीबी विरुद्ध पंजाब (RCB vs PKBS) यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीमुळे आणि दिनेश कार्तिकच्या फिनिशिंग टचमुळे बंगळुरूला पहिला विजय मिळवता आला. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीने टी-20 कारकिर्दीतील 100 वं अर्धशतक झळकावलंय. टी-20 मध्ये 100 अर्धशतक झळकावणारा कोहली हा आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) आक्रमक 77 धावांमुळे आरसीबीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील खातं उघडलं. विराटने आपल्या अफलातून फलंदाजीचा जोर या सामन्यात दाखवला. त्यामुळे अनेकांनी विराटच्या फिटनेसचं कौतूक देखील केलंय. अशातच आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
आरसीबीने दिलेलं 177 धावांचं आव्हान पार करताना आरसीबीला चांगली सुरूवात मिळाली नाही. एकीकडून विराट कोहली आक्रमक खेळत असताना दुसऱ्या बाजूने आरसीबीच्या विकेट्स पडत गेल्या. कॅप्टन फाफ आणि कॅमरून ग्रीन बाद झाल्यानंतर विराट कोहलीने झुंजार खेळी केली. त्यावेळी मॅक्सवेल विराटला साथ देण्यासाठी मैदानात आला. पंजाबकडून हरप्रीत ब्रारचा बॉल बंगळुरूसाठी अडचणीचा ठरत होता. ब्रारसमोर विराटची खेळी देखील संथ झाली होती. त्याला कारण हरप्रीत ब्रारच्या फास्टर ओव्हर... अत्यंत कमी वेळात हरप्रीत ब्रारने पंजाबला 4 ओव्हर पूर्ण करून दिल्या. त्यामुळे आरसीबीची धावगती मंदावली होती. अशातच हरप्रीतच्या ओव्हर स्पीडसमोर विराट देखील थकल्याचं दिसून आलं.
सामन्याची 13 वी ओव्हर टाकण्याची जबाबदारी हरप्रीत ब्रारला देण्यात आली होती. त्यावेळी हरप्रीत ब्रारने जलद ओव्हर फेकण्याची तयारी केली. नॉन स्टाईकला असलेल्या विराटने हरप्रीतला थांबवलं अन् रुक भाई **** सास तो लेने दे, असं म्हणत त्याला थांबवलं. यावेळी विराटने शिवीगाळ केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. त्यावेळी मॅक्सी स्टाईक एन्डला होता. विराटचे शब्द ऐकून मॅक्सीला देखील हसायला आलं. मात्र, त्याचं हास्य जास्त वेळ टिकलं नाही. पुढच्याच बॉलवर मॅक्सवेलची विकेट पडली.
दरम्यान, विजयानंतर विराट कोहलीने अनुष्का, वामिका आणि अकायला व्हिडीओ कॉल केला. या प्रेमळ संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ब्रेक घेऊन त्यांनी गर्भवती अनुष्काची काळजी घेतली होती. दोन महिने त्यांने मैदानापासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवला होता. आता देखील कुटूंबापासून लांब राहु इच्छित नाही.