नवी दिल्ली : महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्या कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत. याचेच एक उदाहरण म्हणजे रूसची वेट लिफ्टर. आजकाल बॉडी बिल्डिंग आणि वेट लिफ्टिंगची केझ मुलींमध्ये देखील दिसून येते. याचीच प्रचिती आपल्याला रूसची वेट लिफ्टर नतालिया कुजनेत्सोवा ला पाहून येते. या २६ वर्षांच्या वेट लिफ़्टरने २०१५ मध्ये निवृत्ती घेतली होती. बेंचाप्रेस आणि डेडलिफ्ट्समध्ये ती वर्ल्ड चॅम्पियन ठरली होती. मात्र ती पुन्हा वेट लिफ्टिंगसाठी सज्ज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या विशाल देहामुळे ती स्वतःला 'जुने जहाज' म्हणून संबोधते. आता नतालिया पूर्वीपेक्षा अधिक प्रभावशाली आणि आकर्षक दिसत आहे. काही काळ विश्रांती घेतलेल्या नतालिया चे म्हणणे आहे की, "युरोपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळांपासून दूर राहिल्यास जीवन निरस वाटते."



सध्या ती वर्ल्ड पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी सज्ज आहे. नतालिया १४ वर्षाची असल्यापासून वेट लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंगचे प्रशिक्षण घेत आहे. ती आता कोच म्हणून काम करणार असल्याचे तिने जाहीर केले. दररोज ६ तास ती तरुण नवोदीत वेट लिफ़्टर्सना ट्रेनिंग देते. 



आपले डाएट काटेकोरपणे पळत असलेली नतालिया आपल्या प्रगतीचे अपडेट्स सोशल मीडियावर देत असते. तिचे साधारणपणे २ लाख फॉलोवर्स आहेत. 



काही वेळेस तिला वाईट कमेंट्सना देखील सामोरे जावे लागते. मात्र अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास ती आता शिकली आहे. 



तिच्या चाहत्यांकडून येणाऱ्या चांगल्या कमेंट्स तिला प्रोत्साहीत करतात.