माजी श्रीलंकन खेळाडूला ट्विट करणं पडलं महागात., लक्ष्मणने उडवली खिल्ली
श्रीलंकासोबत टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर भारतीय टीम आता ३ सामन्यांची वनडे सिरीज खेळणार आहे. पहिली वनडे मॅच 10 डिसेंबरला होणार आहे.
मुंबई : श्रीलंकासोबत टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर भारतीय टीम आता ३ सामन्यांची वनडे सिरीज खेळणार आहे. पहिली वनडे मॅच 10 डिसेंबरला होणार आहे.
वनडे सिरीज सुरु होण्यापूर्वीच माजी श्रीलंकन क्रिकेटर आणि कमेंटेटर रस्सेल अर्नोल्डने सीरीज बाबतीत एक ट्विट केलं आहे. पण हे ट्विट करणं त्यांच्यासाठी महाग पडलं आहे. ज्यामुळे त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
रस्सेल यांनी ट्विट केलं की, 'टेस्ट सीरीज 1-0 ने संपल्यानंतर आता मी वचन करत देतो की, वनडे सिरीज 5-0 ने नाही संपणार. जसं काही महिन्यांपूर्वी झालं होतं.'
रस्सेल यांच्या ट्विटवर माजी भारतीय क्रिकेटर लक्ष्मण यांनी देखील खिल्ली उडवत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, बरोबर रस्सेल, तीन सामन्यांची सिरीज मध्ये असं (5-0) नाही होणार. हे प्रेडिक्शन फेल नाही होणार।'
10 ते 17 डिसेंबरपर्यंत श्रीलंके सोबत 3 वनडे सिरीज होणार आहे. याआधी श्रीलंकन टूरवर दोन्ही टीममध्ये ५ सामन्यांची सिरीज झाली होती. जी भारताने 5-0 ने जिंकली होती.