Russian actress Elena Tuteja Statement : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी केली अन् स्वप्न साकार केलं. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकवला तरी पत्नी नताशाच्या (natasha stankovic) मनाला पाझर फुटला नाही. हार्दिक आणि नताशा यांच्यातील घटस्फोटाची चर्चा वेगाने पसरत असताना आता हार्दिक पांड्या रशियन अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. अशातच आता हार्दिक सोबतच्या नात्यावर रशियन अभिनेत्री एलेना टुटेजा (Elena Tuteja) हिने खुलासा केला आहे.


काय म्हणाली Elena Tuteja ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व चर्चा सुरू असताना एलेना टुटेजा हिने ब्रायन लारासोबतचा एक फोटो शेअर केला अन् हार्दिक पांड्यासोबतच्या रिलेशनशीपच्या अफवांवर खुलासा केला. ना हे फोटोशॉप फोटो आहे ना हार्दिक वालेचे फोटो.. सर्व काही खरे आहे आणि मी कोणालाही डेट करत नाही, असा खुलासा एलेना टुटेजा हिने केलाय. अभिनेत्री आणि मॉडेल असण्याचे फायदे.. मी प्रसिद्ध लोकांसोबत काम करते, असं अभिनेत्री एलेना टुटेजा हिने म्हटलं आहे. 



हार्दिक पांड्यासाठी पोस्ट


रशियन अभिनेत्री आणि मॉडेल एलेना टुटेजा हिने हार्दिक पांड्यासाठी पोस्ट केली होती. हार्दिक तुझ्यामुळे आमची मान उंच झालीये, असं एलेनाने म्हटलं होतं. एलेना टुटेजा हिने हार्दिक पांड्यासोबत एक जाहिरात शूट केली होती. तेव्हापासून दोघं एकमेकांना ओळखतात. रशियन अभिनेत्री एलेना टुटेजा हिने अनेक हिंदी चित्रपट, टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. एलेना टुटेजा आता ती 'प्यार तूने क्या किया' मध्ये दिसणार आहे. हिंदी माझी दुसरी भाषा आहे, असंएलेना टुटेजाने म्हटलं होतं.


दरम्यान, सोशल मीडियावर नताशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मी येथे बसून कॉफीचा आनंद घेत आहे. यावेळी अचानक माझ्या मनात एक विचार आला की, लोक किती लवकर एखाद्याच्या चारित्र्याबद्दल मत निर्माण करतात. जेव्हा एखादी व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागते, तेव्हा आपण सहानुभूती न दाखवता, निरीक्षण न करता फार लवकर त्याच्या चारित्र्याबद्दल मत निर्माण करतो. त्यांना नेमकं काय झालं, या वागण्यामागे नेमकी काय परिस्थिती आहे याचा विचार करत नाही, असं नताशा या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसली.