Football सामन्यादरम्यान खेळाडू भिडले, हाणामारीचा Video Viral
Football Fight: हाणामारीची सुरुवात इंजरी टाइम (90+ मिनिटे) सुरू झाली. त्यावेळी स्पार्टक मॉस्कोकडे फ्री-किकची संधी होती. यावेळी फॉरवर्ड क्विन्सी प्रोम्स आणि झेनितचा मिडफिल्डर विल्मर बॅरिओस एकमेकांच्या खांद्यावर आदळले आणि शाब्दिक वाद झाला.
Football Match Fight: फीफा वर्ल्डकप स्पर्धेचा (FIFA World Cup) थरार सुरु असताना रशियन फुटबॉल कपची चर्चा रंगली आहे. फुटबॉल मैदानातच खेळाडू भिडल्याचा (Football Player Fight) एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 27 नोव्हेंबरला एफसी झेनित आणि स्पार्टक मॉस्को यांच्यात क्रेस्टोवस्की स्टेडियममध्ये सामना रंगला होता. 90 मिनिटांच्या खेळात हा सामना बरोबरीत सुटल्याने अतिरिक्त मिनिटांचा दोन्ही संघात रंगला. मात्र या अतिरिक्त वेळेतही निर्णय लागला नाही. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. 90 मिनिटांचा खेळ सुरु असताना दोन्ही संघाचे कोच आणि खेळाडूंमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. खेळाडूवृत्ती बाजूला ठेवून दोन्ही संघाचे खेळाडू भिडले. हजारो प्रेक्षकांच्या समोरच ही हाणामारी झाली. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
वादाचं नेमकं कारण काय?
हाणामारी सुरुवातीच्या 90 मिनिटांच्या खेळादरम्यान झाली. स्पार्टक मॉस्कोला एक फ्री किक मिळाली होती. यावेळी फॉरवर्ड खेळाडू क्विन्सी प्रोम्स आणि झेनितचा मिडफिल्डर विल्मर बॅरिओस एकमेकांना आदळले आणि त्यावेळी त्यांच्या शाब्दिक चकमक झाली. यानंतर मैदानातील वातावरण चांगलंच तापलं. मैदानात दोन्ही संघाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ भिडले. इतकंच नाही रेफरीच्या समोरच झेनितच्या रॉड्रिगाओ प्राडोनं स्पार्टकच्या खेळाडू लाथ मारली. त्यामुळे स्पार्टकचा सब्सिट्यूट असलेलला अलेक्झेंडर सोबोलेव मधे पडला आणि जोरदार हाणामारी सुरु झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
बातमी वाचा- FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय
रेफरीनं दाखवलं रेड कार्ड तरीही...
मैदानातील वाद पाहता रेफरी व्लादिमीर मोसकलेव यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे रेफरीने मैदानातील 6 खेळाडूंना रेड कार्ड दाखवलं. यात दोन्ही संघाचे प्रत्येकी तीन खेळाडू होते. स्पार्टक संघाकडून अलेक्सांद्र सोबेलेव, शमर निकोलसन आणि अलेक्सांद्र सेलिखोव यांचा समावेश आहे. तर झेनित या संघाकडून बॅरियोस, रॉड्रिगो आणि मॅल्कम यांचा समावेश होता. मात्र भांडणं झालं तेव्हा हे खेळाडू बेंचवर बसले होते आणि हाणामारीत प्रत्यक्ष नव्हते. पेनल्टी शूटआउटमध्ये झेनित या संघाने हा सामना 4-2 ने जिंकला.