Ruturaj Gaikwad : टीम इंडियाला मिळाला नवीन सिक्सरकिंग,Vijay Hazare Trophy त व्रिक्रम
ऋतुराज गायकवाडने 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 सिक्स आणि 10 चौकार लगावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 5 बाद 330 धावा केल्या.
Ruturaj Gaikwad Record : टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत तुफानी खेळी केली आहे. उत्तर प्रदेशविरूद्ध दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झंझावाती द्विशतक ठोकले आहे. या द्विशतकासह त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे द्विशतक ठोकून त्याने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊय़ात.
हे ही वाचा : Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर, पाहा VIDEO
एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर
विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. ऋतुराजने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकले आहे. उत्तर प्रदेशचा बॉलर शिवा सिंहच्या बॉलवर त्याने हे सिक्सर मारले आहेत. असी कामगिरी आतापर्यंत एकाही खेळाडूला करता आली नाही आहे.तसेच शिवा सिंहच्या या एका ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने 43 धावा देखील काढल्या आहेत.
ऋतुराजने 16 सिक्सर ठोकले
ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत नवीन विक्रम केला आहे. ऋतुराजने एका सामन्यात 16 सिक्सर ठोकले आहेत. यापूर्वी सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम एन. जगदीशनच्या नावे होता. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात जगदीशनने 15 सिक्स ठोकले होते. याशिवाय या रॅकिंगमध्ये यशस्वी जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर होता. यशस्वी जैस्वालने झारखंडविरुद्धच्या सामन्यात 12 सिक्स ठोकले होते. 2019 मध्ये त्याने हा पराक्रम केला होता.
रॅकींगमध्ये ईशान किशनचेही नाव
एका मॅचमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणाऱ्या बॅटसमनच्या यादीत विष्णू विनोद चौथ्या क्रमांकावर आहे. विष्णू विनोदने 2019 साली छत्तीसगड विरुद्धच्या खेळीत 11 षटकार ठोकले होते.त्याचबरोबर ईशान किशन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ईशान किशनने 2021 मध्ये खेळताना 11 षटकार मारले होते.
दरम्यान या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 सिक्स आणि 10 चौकार लगावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 5 बाद 330 धावा केल्या. आता उत्तरप्रदेशसमोर 331 धावांचे आव्हान असणार आहे.