Deepak Chahar On Ruturaj Gaikwad: गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरातचा धुव्वा उडवला आणि थाटात फायनलमध्ये (IPL 2023 Final) एन्ट्री मारली आहे. आयपीएलच्या सर्वात तगड्या टीमविरुद्ध चेन्नईने आक्रमक बॉलिंग करत गुजरातचा कार्यक्रम केला. या सर्व सामन्यात महत्त्वाची राहिली ती चेन्नईची फिल्डिंग. एक एक रन वाचवत चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवला. मात्र, आता सामन्यातील पुरस्कार सोहळ्यावरून दीपक चहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं दिसून आलंय. त्याचा मजेशीर व्हिडिओ सीएसकेने शेअर केला आहे.


काय म्हणाला दीपक चहर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तू खूपच निर्लज्ज व्यक्ती आहेस. सामन्यातील कॅच ऑफ द मॅच (Catch Of the Match) पुरस्कार मला मिळाला पाहिजे होता, पण तू तो घेतला आणि मागील सामन्यात रायडूला मिळाला होता, असं दीपक चहर म्हणतो. त्यावर ऋतुराज गायकवाडने उत्तर दिलं...'भाऊ, मेहनत महत्त्वाची आहे. माझा एक योग्य डाईव्ह होता जो योग्य वेळी आला होता, पण तुझा तो सामना संपण्याच्या वेळी आला.'


माझा कॅच देखील डाईव्ह वाला होता, असं दीपक म्हणतो. त्यावर बोलताना...'तुझा झेल चांगला होता पण त्यावेळी समालोचक इतर क्षण दाखव्यात व्यस्थ होते. तू दुखापतीतून ज्या पद्धतीने परतलास ते आश्चर्यकारक होतं, असं म्हणत ऋतुराजने दीपक चहरचं कौतूक केलं आहे.'


पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by IPL (@iplt20)


दरम्यान, सामना रंगतदार स्थितीत असताना चेन्नईच्या समस्या वाढल्या होत्या. सामना जिंकायचा असेल तर विकेट्स काढणं महत्त्वाचं होतं. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने विजय शंकरचा एक भन्नाट कॅच घेतला आणि सामना फिरवला. तर अखेरीस दीपक चहरने देखील मोहम्मद शमीचा कॅच घेत सामन्याला निरोप दिला होता. ऋतुराज गायकवाडच्या अप्रतिम कॅचमुळे त्याला कॅच ऑफ द मॅन पुरस्कार देण्यात आला होता.