मुंबई : लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली की काहीवेळा गर्वही चढतो. त्याचा परिणाम असा होतो की चाहते, क्रिकेटप्रेमी किंवा प्रसिद्धी देणाऱ्या लोकांशीच गैरवर्तन केलं जातं. असाच प्रकार स्टेडियममध्ये पाहायला मिळाला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरिजचा शेवटचा सामना पावसामुळे स्थगित झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही टी 20 सीरिज 2-2 ने ड्रॉ झाली तर शेवटच्या सामन्यात पावसाने खो घातला. 3.3 ओव्हर झाल्यानंतर पाऊस आला त्यामुळे सामना थांबवावा लागला. टीम इंडियाचा स्टार खेळाडू यावेळी स्टेडियममध्ये येऊन बसला. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी ग्राऊंडवर काम करणारा एक कर्मचारी आला. त्याला खेळाडूने लाजीरवाणी वागणूक दिली आहे. 


ऋतुराज गायकवाड पॅवेलियनममध्ये जात असताना तिथे ग्राऊंडवर काम करणारा कर्मचारी सेल्फी घेण्यासाठी आला. त्यावेळी तो भिजलेला असल्याने ऋतुराजने त्याला दूर केलं. सेल्फी घेत असताना ऋतुराजने त्याच्यासोबत केलेल्या वर्तनाचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 



हा व्हिडीओ व्हायरल होताच ऋतुराजला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात आलं. काही युजर्सनी असं वागणं चांगलं नाही. हा गर्व चांगला नाही असंही म्हटलं आहे. तर काही युजर्सनी एवढा कसला माज असाही प्रश्न उपस्थित केला आहे. 


 


मराठमोठ्या ऋतुराजकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत काही युजर्स आणि क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्राऊंडमधील कर्मचाऱ्याशी असं गैरवर्तन केल्याने क्रिकेटप्रेमी चांगलेच ऋतुराजवर नाराज आहेत. तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.