IPL 2022 : टुक-टुक अकॅडमीमध्ये स्वागत; तिसऱ्यांदा फेल झालेल्या खेळाडूवर भडकले फॅन्स
गतविजेत्या चेन्नईच्या टीमची सुरुवात यंदाच्या सिझनमध्ये चांगली झालेली नाही.
मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी खेळलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. या पराभवासह चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये पराभलाची हॅटट्रिक केली आहे. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जचा ओपनर ऋतुराज गायकवाड देखील सलग तिसऱ्या सामन्यात फेल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ऋतुराजला ट्रोल करण्यात येतंय.
गतविजेत्या चेन्नईच्या टीमची सुरुवात यंदाच्या सिझनमध्ये चांगली झालेली नाही. तर ओपनर ऋतुराज गायकवाडही तिसऱ्यांदा मोठी खेळी करण्यात अपयशी झाला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऋतुराज 0 आणि 1 असा पव्हेलियनमध्ये परतला होता. तर कालच्या सामन्यातंही त्याला एकापेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत.
गेल्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या ऋतुराजने सर्वात जास्त 635 रन्स केले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये त्याची बॅट तळपताना दिसत नाहीये. कालच्या सामन्यात कगिसो रबाडाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये गायकडवाडने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शिखर धवनकडे कॅच सोपवला.
ऋतुराज गायकवाडच्या खराब फॉर्मवर ट्विटरवरही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चेन्नईने आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी एमएस धोनी, रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांच्यासह गायकवाड यांना रिटेन केलं होतं.