Vijay Hazare Trophy 2022, Maharashtra Vs Uttrar Pradesh : चेन्नई सुपर किग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा विश्वासू शिलेदार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झंझावाती द्विशतक ठोकले आहे. या द्विशतकासह त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. विजयी हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. त्याच्या या खेळीची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.  



विजय हजारे ट्रॉफित ठोकलं द्विशतक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या (Vijay Hazare Trophy 2022)  दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच वादळ पाहायला मिळालं. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विरुद्धच्या रंगलेल्या सामन्यात गायकवाडने (Ruturaj Gaikwad) द्विशतक ठोकले आहेत. गायकवाडने 159 बॉलमध्ये 220 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 सिक्सर मारले आहेत. त्याच्या या खेळीने त्याने सिलेक्टर्सचे लक्ष पुन्हा वेधले आहे. 


 एका ओव्हरमध्ये ठोकले 7 सिक्सर


ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad World Record) एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहेत. महाराष्ट्राच्या डावाच्या 49व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) ही किमया करून दाखवली आहे. ऋतुराजने बॉलर शिवा सिंहविरुद्ध ओव्हरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 4 सिक्स ठोकले. त्यानंतर पाचवा बॉल नो बॉल ठरला होता, त्या बॉलवर देखील त्याने सिक्स मारला होता. त्यानंतर पुढील दोन बॉलवर देखील त्याने सिक्स ठोकले आहेत.


आतापर्यंत एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकल्याची खेळाडूंची कामगिरी ऐकली असेल,पण प्रथमच एका खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 सिक्स ठोकले आहे. त्याची ही खेळी पाहुन क्रिकेट वर्तुळ अचंबित झाले आहे.


49 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?


ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) 49 व्या ओव्हरमध्ये शिवा सिंहच्या गोलंदाजीवर 7 सिक्सर मारले आहेत. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अस घडलंय, की एका खेळाडूने एका ओव्हरमध्ये 7 सिक्क मारले आहेत, 


49व्या ओव्हरमध्ये 43 धावा


पहिला चेंडू - सिक्स
दुसरा चेंडू - सिक्स
तिसरा चेंडू - सिक्स
चौथा चेंडू - सिक्स
पाचवा चेंडू नो बॉल - सिक्स
पाचवा चेंडू -सिक्स
सहावा चेंडू - सिक्स



ऋतुराजने 5 मोठे रेकॉर्ड तोडले


ऋतुराज गायकवाडने आजच्या सामन्यात वादळी खेळी करून 5 मोठे रेकॉर्ड तोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत ते पाहूयात. 


  • एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकणारा पहिला खेळाडू

  • लिस्ट-ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ऋतुराज हा अकरावा भारतीय खेळाडू ठरलाय. तर महाराष्ट्र संघातून कडून खेळताना तो पहिला बॅटसमन ठरला आहे.

  • ऋतुराजने एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम 

  • महाराष्ट्र टीमने एका ओव्हरमध्ये संघाकडून सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम

  • ऋतुराजने सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम केला आहे. 


ऋतुराज गायकवाडची कामगिरी


विजय हजारे ट्रॉफी 2022  (Vijay Hazare Trophy 2022) मध्ये गायकवाडने (Ruturaj Gaikwad World Record) आपल्या तुफान फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. या मोसमात त्याने 8 डावात 5 शतके आणि एक द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. विशेषत: उपांत्यपूर्व फेरीतील गायकवाडच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली.


दरम्यान या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 षटकांत 5 बाद 330 धावा केल्या. आता उत्तरप्रदेशसमोर 331 धावांचे आव्हान असणार आहे.