Sanju Samson : शुक्रवारपासून टीम इंडिया ( Team India ) विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( Australia ) यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या वनडे सिरीजला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या सिरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे. मात्र यावेळी पूर्ण सिरीजमध्ये संजू सॅमसनला ( Sanju Samson ) संधी देण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजूला ( Sanju Samson ) संधी न दिल्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी चाहत्यांच्या म्हणण्यानुसार संजूवर नेहमी अन्याय केला जातो. दरम्यान संजू सॅमसनला ( Sanju Samson ) टीममध्ये का समाविष्ट केलं जात नाही, यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंतने मोठं विधान केलं आहे.


टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson ) बद्दल भारतीय चाहत्यांमध्ये वेगळी क्रेझ आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे भारतात संजू सॅमसनचे ( Sanju Samson ) चाहते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये. 2023 च्या वर्ल्डकपसाठीही संजू सॅमसनला ( Sanju Samson ) टीम इंडियात स्थान देण्यात आलेलं नाहीये.


Sanju Samson सिनीयर्सचं ऐकत नाही


संजूला टीममध्ये जागा का मिळत नाहीये यावर माजी खेळाडू श्रीसंतने मोठा खुलासा केलाय. श्रीसंत म्हणाला की, गावस्कर सरांपासून ते हर्षा भोगले सर आणि रवी शास्त्री सरांपर्यंत सगळेच त्यांना खूप महत्त्व देतात. संजू सॅमसनच्या क्षमतेबद्दल काहीही शंका नाही. पण पद्धत… मुळात ज्या कोणी त्याला खेळपट्टीनुसार खेळायला सांगते तेव्हा तो ऐकत नाही. संजू ही वृत्ती बदलू शकतो आणि त्याने असं केलं पाहिजे. 


श्रीसंतच्या म्हणण्यानुसार, संजू सॅमसन अनेकदा घाई गडबडीत चुकीचा शॉट खेळून बसतो. आणि याच नादात तो लवकर विकेट गमावून बसतो. त्याने त्याची खेळी एका मोठ्या खेळीत बदलली पाहिजे. जेव्हा पण मी त्याला भेटतो तेव्हा केवळ एकच गोष्ट सांगतो, संजू विकेटचं निरीक्षण कर. थोडं थांब, प्रत्येक गोलंदाजाच्या मागे जाऊ नको. तुझ्यात तशी क्षमता आहे की, तू कधीही, कुठे ही आणि कोणालाही फलंदाजीच्या जोरावर चोपू शकतो. केवळ संधीची वाट पहा.